तैवानमध्‍ये इमारतीला भीषण आग, ४६ जणांचा होरपळून अंत - पुढारी

तैवानमध्‍ये इमारतीला भीषण आग, ४६ जणांचा होरपळून अंत

तैपेई : पुढारी ऑनलाईन

तैवानमधील एक  इमारतीला आज पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत ४६ जणांचा होरपळून मृत्‍यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

दक्षिण तैवान परिसरात असलेल्‍या १३ मजली इमारतीमधील तळमजल्‍यांवरील दुकानांना गुरुवारी पहाटे आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रुप धारण केले. काउशुंग शहरातील अग्‍निशमन दलाच्‍या जवानांनी घटनास्‍थळी धाव घेतली. ११ जणांचा जागीच मृत्‍यू झाला. गंभीर जखमी झालेल्‍या ५५ जणाना रुग्‍णांलयात दाखल करण्‍यात आले.

उपचार सुरु असताना ३५ जणांचा मृत्‍यू झाला. अथक प्रयत्‍नानंतर अग्‍निशमन दलाच्‍या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.स्‍थानिक नागरिकांनी दिलेल्‍या माहितीनुसार पहाटे तीन वाजता इमारतीमध्‍ये मोठा स्‍फोट झाल्‍याचा आवाज झाला. या दुर्घटनेचे कारण अद्‍याप समजलेले नाही.

हेही वाचलं का?

Back to top button