Delhi Crime : धक्कादायक! सिगारेट ओढताना पाहिले म्हणून आठवीच्या विद्यार्थ्यांकडून वर्गमित्राचा खून | पुढारी

Delhi Crime : धक्कादायक! सिगारेट ओढताना पाहिले म्हणून आठवीच्या विद्यार्थ्यांकडून वर्गमित्राचा खून

पुढारी ऑनलाइन डेस्क : दिल्लीच्या Delhi Crime बदरपूरमध्ये एका 12 वर्षीय मुलाचा नाल्यात मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. मात्र, या शाळकरी मुलाचा खून त्याच्याच दोन वर्गमित्रांनी केल्याचे बाब जेव्हा उघडकीस आले. तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. ही घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. मृत मुलगा एमसीडी स्कूल, ताजपूर पहारी, नवी दिल्ली येथे इयत्ता 8 वी चा विद्यार्थी होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Delhi Crime दिल्लीतील बदरपूर येथील एका सरकारी शाळेजवळील नाल्यात 12 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना या संदर्भात गुरुवारी (27 एप्रिल) 8.20 वाजता पीसीआर कॉलद्वारे घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांना खातुश्याम पार्क आणि ताजपूर रोड गावादरम्यान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा या मुलाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा होत्या. एखाद्या बोथट हत्याराने त्याच्यावर वार करण्यात आल्याचे दिसून आले. घटनास्थळी पाठ्यपुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य असलेली स्कूलबॅगही सापडली. स्कूलबॅगपासून सुमारे सहा यार्डांच्या अंतरावर चार-पाच रक्ताने माखलेले दगड आणि रक्ताने माखलेला कापसाचा टॉवेलही सापडला, असे पोलिस उपायुक्त (दक्षिणपूर्व) राजेश देव यांनी सांगितले. दगडावरील रक्ताचे डागांवरून हे सूचित होत होते की खून करण्यासाठी त्याचा उपयोग झाला आहे. Delhi Crime

Delhi Crime : मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार

तत्पूर्वी पोलिसांकडे शाळकरी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार आली होती. गुरुवारी शाळा सुटल्यानंतर मुलगा घरी आलाच नव्हता, अशी तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. रात्री या मुलाचा मृतदेह आढळला तेव्हा बेपत्ता मुलाच्या कुटुंबीयांना बोलवून मृताची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.

दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस शवागारात हलवण्यात आला आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केल्यानंतर दोन मुलांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. मयत मुलाने या दोघांना शाळेच्या आवारात सिगारेट ओढताना पाहिले होते आणि ही माहिती शाळेच्या अधिकाऱ्यांना सांगणार असल्याची धमकी दिली होती. Delhi Crime

परिणामी दोन्ही आरोपी वर्गमित्रांनी त्याला एका निर्जनस्थळी नेले आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. ज्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली. जी प्राणघातक ठरली. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा :

Byju’s ‘ईडी’च्या रडारवर, ३ ठिकाणांची झडती, कागदपत्रे, डिजिटल डेटा जप्त, फेमा अंतर्गत कारवाई

JEE Main : जेईई मेनच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर

Back to top button