China Fire Incident in Hospital: ‘बिजींग’मधील रूग्णालयात आग; २१ जणांचा होरपळून मृत्यू

China Fire Incident in Hospital: ‘बिजींग’मधील रूग्णालयात आग; २१ जणांचा होरपळून मृत्यू

पुढारी ऑनलाईन: चीनची राजधानी बिजींग शहरातील रूग्णालयात आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. येथील चांगफेंग या रूग्णालयात भीषण आग लागल्याने २१ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. ७१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ही आग इतकी भीषण होती की, आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दूरवर दिसत होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तातडीने पोहचले. मात्र, अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीजिंगमधील चांगफेंग हॉस्पिटलमध्ये मंगळवारी (दि.१८) दुपारी १ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. अचानक लागलेल्या आगीनंतर रूग्ण जीव वाचवण्यासाठी खिडकीवर, AC ला लटकताना, खिडकीतून उड्या मारताना दिसल्याचे येथील नागरिकांनी मीडियाला दिलेल्या माहितीत सांगितले आहे. अग्निशमन दलाला मोठ्या कष्टानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. आग इतक्या वेगाने पसरली होती की, रुग्णालयाच्या पूर्वेकडील भागाला आगीने पूर्णत: वेढले होते. या विभागामध्ये गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना दाखल करून उपचार केले जात होते, असे येथील प्रशासनाने दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

आगीचा व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काही लोक आगीपासून वाचण्यासाठी रूग्णालयाला असलेल्या पत्र्यावरून उड्या मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर तिथे काही लोक एसी वर बसलेले दिसले. एका यूजरने सोशल मीडियावर लिहिले आहे की, 'हे दुःखदायक आहे'. मी माझ्या घराच्या खिडकीतून अपघात पाहू शकलो. दुपारी वातानुकूलित युनिटवर अनेक लोक उभे होते आणि काहींनी जीव वाचवण्यासाठी खाली उड्याही मारल्या.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news