Coronavirus updates | पुन्हा चिंता वाढली! देशात २४ तासांत कोरोनाचे १०,५४२ नवे रुग्ण | पुढारी

Coronavirus updates | पुन्हा चिंता वाढली! देशात २४ तासांत कोरोनाचे १०,५४२ नवे रुग्ण

पुढारी ऑनलाईन : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १०,५४२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या ६३,५६२ वर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. याआधीच्या दिवशी देशात ७,६३३ कोरोना रूग्णांची नोंद (COVID-19 Update) झाली होती. पण गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

महाराष्ट्रात आणखी ६ जणांचा मृत्यू, एप्रिलमध्ये ४४ मृत्यू

महाराष्ट्रात मंगळवारी ६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे एप्रिलमधील मृतांची संख्या ४४ वर पोहोचली आहे. राज्यात मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाली असून नवीन ९४९ रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी ५०५ रुग्णांची नोंद झाली होती. मुंबईत मंगळवारी २२० रुग्ण आढळून आले. सोमवारी १३१ रुग्णांची नोंद झाली होती. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने २२ मार्चपासून सक्रिय रुग्णांच्या वाढीचा आलेख उंचावला आहे. यात भरीस भर म्हणजे मे महिन्यात रुग्णसंख्या आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही वाढून पाच ते सहा हजारांच्या घरात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मास्क वापरण्याचा सल्ला

दिल्लीत कोरोनाचे १,५३७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने ॲडव्हाजरी जारी केली आहे. वृद्ध व्यक्ती, मुले, गरोदर महिलांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच मास्कचा वापर करा, असे आवाहन त्यातून करण्यात आले आहे.

 हे ही वाचा :

Back to top button