Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संसदीय समितीकडून चौकशी, जाणून घ्या काय आहे प्रकरण? | पुढारी

Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संसदीय समितीकडून चौकशी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सध्या चर्चेत आले आहेत. त्यांची  संसदीय मानक आयुक्तांमार्फत चौकशी सुरु आहे.  ऋषी सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती एका चाइल्ड केअर फर्ममध्ये गुंतवणूकदार आहेत. अशा परिस्थितीत सुनक यांने चाइल्डकेअर कंपनीत पत्नीची हिस्सेदारी योग्य प्रकारे जाहीर केली आहे का, त्यांनी कुठेतरी नियमांचे उल्लंघन केले आहे का? याची चौकशी केली जाणार आहे. (Rishi Sunak )

ब्रिटन पार्लमेंट कमिश्नरच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, १३ एप्रिलपासून आयुक्त डॅनियल ग्रीनबर्ग यांनी ऋषी सुनक यांची चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी आचार नियमांच्या कलम ६ अंतर्गत सुरु आहे. सुनक यांनी  पत्नी अक्षता यांची कंपनीत असलेली पार्टनरशिप जाहीर केलेली नाही, असा आरोप इंग्‍लंडमधील विरोधी पक्षांनी केला होता.

सुनक यांच्या प्रवक्त्याने तपासाला दुजोरा 

तपासाला दुजोरा देत असताना सुनक यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही तपासामध्ये पूर्ण सहकार्य करत आहोत, तपासात पारदर्शकता राहावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळेच आयुक्तांना आम्ही आनंदाने सहकार्य करत आहोत, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची नियुक्‍ती झाल्यानंतर त्यांच्‍या पत्नी अक्षता मूर्ती याही चर्चेत आल्या होत्या. अक्षता मूर्ती भारतीय आयटी कंपनी ‘इन्फोसिस’चे संस्‍थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे.

सुनक दोषी आढळल्यास ?

ऋषी सुनक यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना शिक्षा होवू शकते; पण ती शिक्षा काय असणार यावरूनही चर्चा होवू लागली आहे. आरोप सिद्ध झाल्यास त्यांना माफी मागण्यास सांगितले जाऊ शकते. सोबतच त्यांच्यावर कारवाईही होऊ शकते. अशा स्थितीत त्यांच्यावर कारवाई करणारी समिती त्यांना सदस्यत्वावरून निलंबित किंवा बडतर्फ करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Back to top button