पुढारी ऑनलाईन: फिजीमध्ये पुन्हा एकदा आज (दि.१८) तीव्र भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू फिजीची राजधानी असलेल्या सुवा या शहराच्या दक्षिणेला ४८५ किमी अंतरावर, ५६९ किमी खोलीवर असल्याचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीत सांगितले आहे.
यापूर्वी अनेकदा फिजीमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गुरूवारी (दि.१३) देखील फिजीमध्ये ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला असल्याचे भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले आहे. फिजी दक्षिण प्रशांत महासागरात असलेला देश आहे. ३०० हून अधिक बेटांपासून हा देश बनला आहे. अद्याप या भूकंपात कोणतेही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.