Sanjay Raut : छत्रपती संभाजीनगरमधील दंगे सरकार पुरस्कृत : संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut : छत्रपती संभाजीनगरमधील दंगे सरकार पुरस्कृत : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती संभाजीनगरमधील दंगे सरकार पुरस्कृत आहेत. असे दंगे मुंबईमध्येही होत आहेत आणि होतील. सरकार घाबरले आहे म्हणून ते हिंदू-मुस्लिम असा वाद निर्माण करुन राजकारण करत आहेत. देशभरात असे दंगे करुन शांतता भंग करण्याची त्यांची ईच्छा आहे. मात्र, असे कितीही प्रयत्न केले तरी त्यांना हे शक्य होणार नाही. (Sanjay Raut) तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची सभा होणार, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Sanjay Raut : सभा होऊ नये म्हणून कारस्थान 

माध्यमांशी बोलत असताना राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी दंगली घडवून आणल्या जात आहेत. काही ठिकाणी दंगली झाल्या. तर काही ठिकाणी दोन्ही धर्मातील लोकांनी सांमजस्य दाखवत या दंगली रोखल्या. पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यात तेढ निर्माण केली जात आहे. त्यांना शांतता नको आहे. ज्या पद्धतीचा पांठिबा उद्धव ठाकरेंना मिळत आहे. त्यांना पुढील राजकीय भविष्य दिसत आहे. त्यामुळे ते असे दंगे घडवत आहेत. पण आम्ही सर्वांना पुरुन उरु. येत्या रविवारी (2 एप्रिल) छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकासआघाडीची सभा होणार आहे. ती सभा होऊ नये किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव या सभेला परवानगी मिळू नये, हे कारस्थान केलं जात आहे.
यापूर्वी कधी रामनवमी दरम्यान हल्ले झाले नाहीत. पण सभांना लोकांचा प्रतिसाद मिळत आहे हे पाहून काही लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे ते काही लोकांना हाताशी घेऊन अशा दंगली घडवून आणायच्या आणि कारण नसताना जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करायची. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकराबदद्ल जे विधान केलं ते योग्य आहे. त्याचा पुरावा या दंगली आहेत. मात्र, महाविकास आघाडीची सभा होणार आणि त्याला महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा

Back to top button