USA Visa | अमेरिकेतील भारतीयांना दिलासा! ‘H-1B व्हिसा’ संदर्भात कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय | पुढारी

USA Visa | अमेरिकेतील भारतीयांना दिलासा! 'H-1B व्हिसा' संदर्भात कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी दिलासा देणारा निर्णय अमेरिकेतील न्यायाधिशांनी दिला आहे. येथील एका न्यायालयातील न्यायाधिशांनी H-1B व्हिसा धारकाच्या जोडीदाराला अमेरिकेत काम करता येईल असा निर्णय दिला आहे. अमेरिकेतील जिल्हा न्यायाधिश तान्या चटकन यांनी ‘सेव्ह जॉब्स यूएसए’ने दाखल केलेली याचिका फेटाळत हा निर्णय दिला आहे. ज्या याचिकेत माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळातील नियम रद्द करण्याची विनंती करण्यात आली होती. या नियमानुसार, H-1B व्हिसा धारकांच्या विशिष्ट श्रेणीतील जोडीदारांना रोजगार अधिकृतता कार्ड जारी केले जातात. याद्वारे H-1B व्हिसा धारकाच्या जोडीदाराला अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते.

मात्र या निर्णयाला अॅमेझॉन, ऍपल, गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या तंत्रज्ञान कंपन्यांनी याला विरोध केला आहे. या नियमानुसार, अमेरिकेने आतापर्यंत सुमारे १० हजारहून अधिक H-1B कामगारांच्या जोडीदारांना कामाचे अधिकार दिले आहेत, ज्यात मोठ्या संख्येने भारतीय आहेत. याविषयी न्यायाधीश तान्या चटकन यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, ‘सेव्ह जॉब्स यूएसए’चा पहिला युक्तिवाद असा आहे की, काँग्रेसने होमलँड सिक्युरिटी विभागाला कधीही एच-4 व्हिसा धारकांसारख्या परदेशी नागरिकांना यूएसमध्ये राहून काम करण्याची परवानगी दिली नाही.

न्यायाधिशांनी पुढे म्हटले आहे की, काँगेसने विचारपूर्वक आणि स्पष्ट स्वरूपात अमेरिका सरकारला अधिकार दिला आहे की, ते अमेरिकेत H-4 व्हिसा धारकाच्या जीवनसाथीला राहण्याची आणि रोजगार करण्यासाठी परवानगी द्यावी. न्यायाधीशांच्या H-1B व्हिसा धारकांच्या साथीदारासंदर्भातील निर्णयाचे भारतीय-अमेरिकन समुदायाचे प्रमुख नेते आणि आयोगाचे सदस्य अजय जैन भुटोरिया यांनी स्वागत केले आहे. अमेरिकन कंपन्या H-1B व्हिसाच्या माध्यमातून परदेशी कामगारांना विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याची परवानगी देतात.

हेही वाचा:

Back to top button