Jobs in Artificial Intelligence : जगाला ‘एआय’चा धसका; मात्र भारतात ४५ हजार नोकऱ्या! अहवालातील माहिती

Jobs in Artificial Intelligence : जगाला ‘एआय’चा धसका; मात्र भारतात ४५ हजार नोकऱ्या! अहवालातील माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क: एका बाजूला जगभरात रोजगार कमी होतील, असा कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) धसका घेतला आहे. अनेकांच्‍या मनात  AI वापरामुळे नोकऱ्या जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र भारतात आर्टिफिशिएल इंटेलिजेंसमध्ये ४५ हजार नोकऱ्या रिक्त (Jobs in Artificial Intelligence) असल्याची माहिती TeamLease या डिजिटल फर्मने दिली आहे.

'टीमलिज' ही IT, Telecom, Healthcare आणि Engineering मधील व्यवसायिकांना नोकरीची संधी देणारी फर्म आहे. या फर्मने भारतातील कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नोकऱ्यांच्या उपलब्धतेविषयी अहवाल सादर केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात नोकऱ्यांची भरमसाठ नोकऱ्या आहेत. सध्या या क्षेत्रातील ४५ हजारांहून अधिक पदे  रिक्त आहेत. या क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये सुरुवातीला 10 लाख रुपये ते 14 लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळत आहे. या क्षेत्रातील (Jobs in Artificial Intelligence) अधिक अनुभव असलेल्या लोकांना दुप्पट पगार मिळू शकतो, असे देखील अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

'टीमलिज'ने दिलेल्या अहवालानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात ChatGPT, Dall-E, Bing AI आणि Midjourney सारख्या सेवा सध्या उपलब्ध आहेत. या क्षेत्रात भारतात हेल्थकेअर, शिक्षण, बँकिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि रिटेल यांसारख्या क्षेत्रातील विविध भूमिकांसाठी संधी आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील नोकऱ्या येत्या काही वर्षांत देशाच्या AI मार्केटमध्ये वाढ करतील. या क्षेत्राने गेल्या वर्षी १२.३ अब्ज डॉलरची कमाई केली आहे. यापुढे वार्षिक विकास दराने (CAGR) या क्षेत्रात २० टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज व्‍यक्‍त केला आहे. हे क्षेत्र २०२५ पर्यंत ४५०-५०० अब्ज डॉलर महसुलापर्यंत पोहोचण्याचा अंदाज देखील या अहवालात देण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र (Jobs in Artificial Intelligence) भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या १० टक्के असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news