

बिजिंग; पुढारी ऑनलाईन : हरीण आपली तुटलेले शिंगे पुन्हा वाढवते. सरडा आपली शेपूट पुन्हा उगवतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे तुटलेले हात पाय पुन्हा येऊ शकतात का? सध्या तरी याचे उत्तर नाही, असे नकारार्थीच आहे; पण तोही दिवस आता फार दूर नाही, की मनुष्य देखील असे करु शकेल. अशी क्षमता साध्य करण्यापासून माणूस आता फक्त एक पाऊल दूर आहे. (Regrowing Human Body Part) आम्ही जे तुम्हाला सांगतो आहे ते वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटत असेल. पण यावर चीनमध्ये संशोधन सुरु आहे.
अवयवाची पुनर्निमिती करणाऱ्या पेशी मानवी शरीरात टाकण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. या सेलचे नाव आहे ब्लास्टेमा सेल (Blastema Cells). हे हरणांच्या शरीरात आढळते. हरणाचे शिंग तुटले तर ते पुन्हा वाढू लागते. आता शास्त्रज्ञांना त्याच ब्लास्टेमा पेशींचा वापर मानवाच्या फायद्यासाठी करायचा आहे. (Regrowing Human Body Part) चीनमधील शियान येथे असलेल्या नॉर्थवेस्टर्न पॉलिटेक्निकल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी असा प्रयोग केला आहे. हा अभ्यास जर्नल सायन्समध्ये प्रकाशित झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शास्त्रज्ञांनी हरणाच्या शरीरात सापडलेल्या ब्लास्टेमा प्रोजेनिटर पेशी उंदराच्या डोक्यात टाकल्या. तेव्हा ४५ दिवसांनंतर उंदराच्या डोक्यावर शिंगासारखा आकार तयार झाल्याचे दिसून आले. (Regrowing Human Body Part)
चीनमध्ये सुरु असलेल्या नवीन संशोधनात असे म्हटलं आहे की, जर तुम्ही वर्षभर हरणांच्या शिंगांचा अभ्यास केला तर ते कसे तुटतात आणि पुन्हा वाढतात हे कळते. हे एक उत्तम मॉडेल आहे, ज्यातून आपण पुन्हा मानवी अवयव वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. अशी शक्यता आहे की ब्लास्टेमा पेशी मानवांमधील हाडांची पुन्हा निर्मिती करू शकतात.
हरणांच्या शरीरातील स्टेम सेलमध्ये ब्लास्टेमा पेशी आढळून आल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. ते हरणाचे शरीर कधीही सोडत नाही. त्याची शिंगे पडताच ब्लास्टेमा पेशी सक्रिय होतात. शिंग पूर्णपणे पडल्यावरच नवीन शिंग तयार करण्याचे काम सुरू होते.
अनेक सस्तन प्राण्यांमध्ये अवयव स्वत: पुननिर्माण करणाऱ्या पेशी असतात, परंतु हरीण हा एकमेव प्राणी आहे जो त्याचा वापर करतो. कारण दरवर्षी हरणाचे शिंग पुन्हा एकदा वाढते.
अधिक वाचा :