Earthquake : उत्तराखंडमध्ये कधीही होऊ शकतो मोठा भूकंप; शास्त्रज्ञांचा इशारा | पुढारी

Earthquake : उत्तराखंडमध्ये कधीही होऊ शकतो मोठा भूकंप; शास्त्रज्ञांचा इशारा

पुढारी ऑनलाइन डेस्क : तुर्कीसारखाच भूकंप Earthquake उत्तराखंडमध्ये होऊ शकतो, असा इशारा एनजीआरआयच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे. राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेचे (एनजीआरआय) मुख्य शास्त्रत्र डॉ. राव म्हणाले, तुर्कीला धडकी भरवणा-या भूकंपासारखाच भूकंप उत्तराखंड प्रदेशातील फ्लॉट लाइन्समध्ये अगदीच जवळ आहे आणि तो केव्हाही होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने याचे वृत्त दिले आहे.

टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार शास्त्रज्ञ राव यांनी सांगितले की, उत्तराखंड प्रदेशात पृष्ठभागाच्या खाली भूगर्भीय हालचाली मोठ्या प्रमाणात होत आहे. वेगाने होणा-या भूगर्भीय हालचालींमुळे मोठा भूकंप Earthquake होऊ शकतो. मात्र, भूकंप नेमका केव्हा होईल याची तारीख आणि वेळ सांगता येत नाही. भूकंपामुळे होणारा विनाश अनेक घटकांवर अवलंबून असेल. जे एका भौगोलिक क्षेत्रातून दुस-या भौगोलिक क्षेत्रात बदलतात.

राव म्हणाले की, आम्ही उत्तराखंडवर हिमालयीन प्रदेशात आम्ही 80 भूकंप केंद्रे Earthquake स्थापन केली आहेत. आम्ही सातत्याने रीअल-टाइम परिस्थितीचे निरीक्षण करत आहोत. आमच्याकडे जमलेला डेटा दाखवतो जमिनीखाली मोठ्या प्रमाणात भूगर्भीय हालचाली होत आहे. भूगर्भीय हालचालींची नोंद ठेवण्यासाठी आम्ही परिसरात जीपीएस नेटवर्क विकसित केले आहे. हे जीपीएस पॉइंट सतत हलत आहेत. त्यामुळे पृष्ठभागाखालील बदल समजत आहेत.

राव म्हणाले की, पृथ्वीवर काय घडत आहे हे निर्धारित करण्यासाठी व्हेरिओमेट्रिक जीपीएस डेटा प्रोसेसिंग ही एक विश्वासार्ह पद्धत आहे. व्हेरिओमीटर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील फरक मोजतात. “आम्ही अचूक वेळ आणि तारखेचा अंदाज लावू शकत नाही, परंतु उत्तराखंडमध्ये कधीही मोठा भूकंप Earthquake होईल,” राव यांनी ठामपणे सांगितले.

उत्तराखंडला बद्रीनाथ आणि केदारनाथ या तीर्थक्षेत्रांचे प्रवेशद्वार मानले जाते. तसेच येत्या दोन महिन्यात चार धाम यात्रा सुरू होत आहे. ज्यामुळे लाखो भाविक उत्तराखंडमध्ये येतात. अलीकडच्या काळात उत्तराखंडमधील जोशीमठ आणि आसपासच्या परिसरात सातत्याने भूस्खलन होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी दिलेला मोठ्या भूकंपाचा Earthquake इशारा हा चिंता वाढवणारा आहे.
साधरणपणे 8 तीव्रतेच्या भूकंपाला मोठा भूकंप म्हणतात. तुर्कीला 7.8 रीश्टर स्केलचा भूकंप जाणवला. मात्र त्याला तांत्रिकदृष्ट्या मोटा भूकंप म्हणता येत नाही. मात्र तुर्कीत निकृष्ट दर्जाच्या बांधकाम आणि अन्य कारणास्तव मोठा विध्वंस झाला आहे.तर जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत पसरलेल्या हिमालयीन प्रदेशात 8 हून अधिक तीव्रतेचा भूकंप Earthquake होण्याची शक्यता आहे, असे राव म्हणाले.

Earthquake भूकंपात होणारे नुकसान हे विविध घटकांवर अवलंबून असत. लोकसंख्येची घनता, इमारती, पर्वत किंवा मैदाने, बांधकामाचा दर्जा, असे वेगवेगळे घटक त्यावर प्रभाव टाकतात. आमच्या अंदाजानुसार मोठा भूकंप झाल्यास तुर्कीप्रमाणेच किंवा त्याहून अधिक नुकसान होऊ शकते मात्र विध्वंस किती मोठा असू शकतो याविषयी भाष्य करू शकत नाही, कारण ते विविध घटकांवर अवलंबून असते.

हे ही वाचा :

Turkey earthquake update : तुर्कीच्या दुसऱ्या भूकंपात  ३ ठार, २०० हून अधिक जखमी

Turkey local Thanks India : ‘गॉड ब्लेस इंडिया’, भूकंपग्रस्त तुर्कीवासीयांनी केली भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त (पाहा व्हिडिओ)

 

Back to top button