Heavy Snow Across California : हिमवादळामुळे कॅलिफोर्नियात आणीबाणी; ९ जणांचा मृत्यू | पुढारी

Heavy Snow Across California : हिमवादळामुळे कॅलिफोर्नियात आणीबाणी; ९ जणांचा मृत्यू

कॅलिफोर्निया; वृत्तसंस्था : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील 13 शहरांना हिमवादळाचा तडाखा बसल्याने आणीबाणी जाहीर केली आहे. या वादळात आतापर्यंत 9 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 100 पेक्षा अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. (Heavy Snow Across California)

मोठ्या प्रमाणावर बर्फवर्षाव होत असल्याने कॅलिफोर्नियातील 70 हजारपेक्षा अधिक घरांतील वीज गायब झाली आहे. येत्या काहो दिवसांत 18 ते 24 इंचापर्यंत बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (Heavy Snow Across California)

आठवड्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे आणि डिसेंबर ते फेब—ुवारीपर्यंत होत असलेल्या हिमवर्षावामुळे कॅलिफोर्नियातील दुष्काळाची समस्या कमी झाली आहे.

अमेरिकेच्या नॅशनल ओशोनिक अ‍ॅण्ड अ‍ॅटमॉस्फिरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशने नुकताच दुष्काळाचा नकाशा जारी केला होता. यानुसार कॅलिफोर्नियातील 17 टक्के भागात दुष्काळ पडला नव्हता.

अधिक वाचा :

Back to top button