नीट पीजी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याच्या विनंतीची याचिका फेटाळली | पुढारी

नीट पीजी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याच्या विनंतीची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – नीट पीजी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याच्या विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ही परीक्षा ५ मार्च रोजीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे सांगत ही परिक्षा पुढे ढकलण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली होती.

नीट पीजी परिक्षा ५ मार्च रोजी घेतली गेली तर 11 ऑगस्टनंतर कौनि्सलिंग सुरु होईल. याच कालावधीत इंटर्नशिपची कट ऑफ तारीख येत असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता. इंटर्नशिपची वेळ आणि परीक्षा या दोघांमधले अंतर सहसा दोन महिन्यांपेक्षा जास्त नसते, असे ॲड. गोपाल शंकरनारायणन यांनी सांगितले. दुसरीकडे पहिल्या टप्प्यात 2.03 लाख विद्यार्थ्यांनी तर दुसऱ्या टप्प्यात केवळ ६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. शिवाय काही मोजक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे, असा युक्‍तिवाद केंद्र सरकारकडून करण्यात आला होता.

हेही वाचा :

 

Back to top button