पुढारी ऑनलाईन : एलन मस्क यांच्या मालकीच्या ट्विटरने शनिवारी (दि.२५) पुन्हा काही कर्मचाऱ्यांना काढून टाकले. ऑक्टोबरमध्ये मस्क यांनी ट्विटर हे सोशल नेटवर्क ताब्यात घेतले. यावेळीपासून मस्क यांनी शनिवारी आठव्यांदा कर्मचारी कपात केल्याची माहिती दिली. यावेळी ट्विटरने पुन्हा ५० कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्ने दिली आहे.
ट्विटमधून काढून टाकण्यात आलेल्यांमध्ये अनेक इंजिनिअर्सच्या टीम आहेत. यामध्ये जाहिरात तंत्रज्ञान, मुख्य ट्विटर अँप कर्मचारी, सिस्टम चालवणाऱ्या पायाभूत सुविधेतील कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणी ट्विटरकडून अद्याप कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
नोव्हेंबर, २०२२ च्या सुरुवातीला ट्विटरने खर्च कपातीचे कारण देत, सुमारे ३,७०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. एलन मस्क यांनी कंपनी ४४ अब्ज डॉलरला विकत घेतल्यानंतर हे सगळ्यात मोठे पाऊल उचलले आले. मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर, महसुलात झालेल्या घट भरून काढण्याच्या उद्देशाने नोकऱ्या कपातीचे धोरण अवलंबले. आत्तापर्यंत मस्क यांनी कंपनीच्या कर्मचार्यांमध्ये जवळपास ७० टक्के कपात केली आहे.