वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेसोबत सातत्याने बिघडत चाललेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर चीनने आपली आण्विक शक्ती वाढवण्याची योजना आखली आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीने त्यासाठी तयार केलेल्या ब्ल्यू प्रिंटला राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मंजुरी दिली आहे. येत्या 2027 पर्यंत चीनच्या भात्यात 550 अण्वस्त्रे असतील. सध्या ही संख्या 350 आहे. पुढे 2035 पर्यंत चीन आपली अण्वस्त्रसज्जता 900 पर्यंत नेणार आहे. (China's Nuclear)
'क्योडो न्यूज'ने याबाबतचे वृत्त दिले असून, वृत्तानुसार, अण्वस्त्रांबाबतचे 'नो फर्स्ट यूज' या जागतिक धोरणाविरोधात जाऊन युद्धाच्या परिस्थितीत चीन कोणत्याही देशावर अणुबॉम्ब टाकू शकतो. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चीन 2027 पर्यंत 550 अण्वस्त्रांचेे उद्दिष्ट पूर्ण करेल, उर्वरित 350 अण्वस्त्रे 2035 पर्यंत तयार होतील. (China's Nuclear)
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले तेव्हा 'नाटो' इच्छा असूनही रशियावर आक्रमण करू शकला नाही. त्यामागे रशियाची अण्वस्त्रसज्जता हेच मुख्य कारण आहे, असे सांगून गतवर्षी नोव्हेंबर महिन्यातच जिनपिंग यांनी अण्वस्त्रांच्या महत्त्वावर भर दिला होता. (China's Nuclear)
'क्योडो न्यूज'ने हे वृत्त प्रकाशित करण्यापूर्वी 2022 मध्ये अमेरिकेनेही चीन आपली आण्विक शक्ती वाढवत असल्याचा दावा केला होता. 2035 पर्यंत चीन आपल्या अण्वस्त्रांची संख्या 1,500 पर्यंत नेईल, असे अमेरिकेने म्हटले होते.
कुणाकडे, किती अण्वस्त्रे
रशिया : 5,977
अमेरिका : 5,428
चीन : 350
फ्रान्स : 290
ब्रिटन : 225
पाकिस्तान : 165
भारत : 160
इस्रायल : 90
उत्तर कोरिया : 20
अधिक वाचा :