Syria Earthquake : मृत्यूच्या छायेत एकाच कुटुंबातील पाच जणांनी अनुभवला 'पुनर्जन्म' | पुढारी

Syria Earthquake : मृत्यूच्या छायेत एकाच कुटुंबातील पाच जणांनी अनुभवला 'पुनर्जन्म'

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुर्की आणि सीरियात झालेल्या भूकंपाने मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्त हानी झाली आहे. मृतांचा आणि जखमींचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. सीरियातील नागरी संरक्षण स्वयंसेवी संस्था ‘द व्हाईट हेल्मेट्स’ने बचावाचा  एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ढिगाऱ्याखाली सापडलेल्या भूकंपग्रस्तांची बचाव पथक कशी सुटका करत आहेत आणि सुटकेनंतर भूकंपग्रस्तांच्या चेहऱ्यावरील पुनर्जन्‍म लाभल्‍याचा आनंद दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्‍हायरल झाला आहे. (Turkey-Syria Earthquake )

Turkey-Syria Earthquake : जिवंतपणी अनुभला पुनर्जन्म

सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी तुर्कस्‍तान आणि सीरियाला शक्‍तीशाली भूकंपाचा तडाखा बसला. या भूकंपात मृतांची संख्या  २८,००० हून अधिक झाली आहे. भूकंपानंतर उद्ध्वस्त झालेल्या इमारतींमध्ये हजारो मदत कर्मचारी अजूनही खोदकाम करत आहेत. आज ( दि. १२ ) आणखी एक भूकंपग्रस्तांना वाचवितानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये बचाव पथकातील पोलीस भूकंपग्रस्तांना मदत करताना दिसतं आहेत.

गेली सहा दिवसांपेक्षा अधिक दिवस ढीगार्‍याखाली गाडलेले जाणूनही जिंवत राहिलेले  पाचही भूकंपग्रस्त एकाच कुटूंबातील आहेत. हा व्हिडिओ सीरियन नागरी संरक्षण स्वयंसेवी संस्था द व्हाईट हेल्मेट्सने शेअर केला आहे. तर हा व्हिडिओ पश्चिम सीरियाच्या इदलिब प्रांतातातील  आहे. या पाचजणांमध्ये तीन मुले आणि दोन प्रौढांचा समावेश आहे. हे सर्व त्यांच्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सापडले होते. त्यांना वाचवण्यात बचाव पथकातील पोलीसांना वाचवण्यात यश आले आहे. या पाचही जणांना वाचवल्यानंतर त्या भूकपंग्रस्तांच्या चेहऱ्यावर आणि जमलेल्या लोकांत आनंदाच वातावरण निर्माण झाले.

Earthquake death : भूकंपबळींची संख्या ५०,००० वर जाईल

नुकतेच संयुक्त राष्ट्रांचे (UN – United Nations) मदत प्रमुख मार्टिन ग्रिफिथ ( Martin Griffiths) यांनी  एका वृत्तसंस्थाशी बोलताना सांगितले की, “तुर्की आणि सीरियातील भूकंपबळींचा आकडा  ५०,००० च्यावर जावू शकतो. मृतांची संख्या सध्या २८ हजारांहून अधिक आहे. ती दुप्‍पट होईल. अचूक अंदाज लावणे कठीण आहे की मृतांचा आकडा किती असेल; पण मला खात्री आहे की, हा आकडा दुप्पट किंवा अधिक होईल. आता  भूकंपातील जखमींची काळजी घेणे गरजेचे आह

हेही वाचा

 

Back to top button