Pakistan Blast : पाकिस्तानातील मशिदीमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, 25 जण ठार | पुढारी

Pakistan Blast : पाकिस्तानातील मशिदीमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, 25 जण ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Pakistan Blast : पाकिस्तानातील पेशावर येथील एका मशिदीत आत्मघाती हल्ला झाला. या स्फोटात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 90 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. नमाज सुरु असताना हल्लेखोराने बॉम्बने स्वत:ला उडवून दिले. स्फोट एवढा जोरदार होता की त्यामुळे मशिदीचा एक भाग पूर्णपणे कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यातील मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पेशावरमध्ये येथील पोलीस वसाहतीमधील मशिदीमध्ये भाविक नमाज पठण करत होते, त्यावेळी अचानक बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर पोलीस आणि तपास यंत्रणा पोहचल्या असून तपास सुरु आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. पण या बॉम्बस्फोटात मोठी जीवित व आर्थिक हानी झाल्याचं समजते आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉम्बस्फोट झाल्यानंतर मशिदीचे छत कोसळले. (Pakistan Blast)

Back to top button