Twitter Hacked : धक्कादायक; ट्विटर यूजर्सचे तब्बल 20 कोटी ईमेल आयडी ‘चोरीला’! | पुढारी

Twitter Hacked : धक्कादायक; ट्विटर यूजर्सचे तब्बल 20 कोटी ईमेल आयडी 'चोरीला'!

पुढारी ऑनलाइन डेस्क : Twitter News : ट्विटर संदर्भात गेल्या काही दिवसात नेहमीच वेगवेगळी माहिती समोर येत आहे. एका सेक्युरिटी रिसर्चरने बुधवारी दावा केला आहे की, ट्विटर यूजर्सचे तब्बल 20 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक युजर्सचे ई मेल आयडी चोरीला गेले आहेत. तसेच हे आय डी हँकिंग फोरमवर पोस्ट करण्यात आल्या आहेत. या माहितीमुळे अनेक ट्विटर युजर्स चिंतेत आहे. मात्र, ट्विटर कडून या दाव्यावर अद्याप कोणतीही टिप्पणी करण्यात आलेली नाही.

Twitter News : याविषयी इजराइलचे सायबर सेक्युरिटी-मॉनिटरिंग फर्म हडसन रॉक ने सह-संस्थापक अलोन गैल यांनी लिंक डिनवर याविषयी लिहिले आहे. ते म्हणाले, ”दुर्दैवाने या घटनेमुळे बरेच हॅकिंग, टार्गेट फिशिंग आणि डॉक्सिंग होईल. ही सर्वात महत्वाची गळती आहे.”

याविषयी गेल ने पहिल्यांदा 24 डिसेंबरला सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून याचा खुलासा केला होता. गेलने असेही लिहिले की ट्विटरने या समस्येची चौकशी किंवा निराकरण करण्यासाठी काय कारवाई केली हे स्पष्ट नाही.

Twitter News : आणखी एका एक्सपर्टकडून दाव्याची पुष्टी

याबाबत ब्रीच-नोटिफिकेशन साइट हैव आई बीन प्वेन्ड चे निर्माता ट्रॉय हंट ने लीक झालेल्या डेटाला पाहून ट्विटरवर म्हटले आहे की, असे वाटते हे जसे सांगितले आहे तसेच आहे. यूजर्सचा जो डाटा लीक केला गेला आहे. त्या स्क्रीनशॉटमध्ये हॅकर्सची ओळख किंवा स्थानाचा कोणताही पुरावा ठेवण्यात आलेला नव्हता.

Twitter News : 2021 च्या सुरुवातीची घटना

असे असले तरी चर्चा अशी आहे की डाटा लीकचे हे प्रकरण 2021 च्या सुरुवातीला घडले असण्याची शक्यता आहे. त्यावेळी एलन मस्क यांनी ट्विटरचे अधिग्रहण केलेले नव्हते.

तसेच नेमके कोणत्या देशातील किंवा कोणत्या भागातील ई-मेल आयडी चोरीला गेले आहेत. यामध्ये भारतीय युजर्सच्या इमेल आयडीचा समावेश आहे का नाही, अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Twitter News : ट्विटरकडून अजून दुजोरा नाही

ट्विटरकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही टिप्पणी अथवा दुजोरा देण्यात आलेला नाही. सध्या ट्विटर एलॉन मस्कच्या स्वामित्व असलेल्या कंपनीच्या निगरानीत आहे.

हे ही वाचा :

गोव्यातील महिलेने अमेरिकन नवर्‍यासाठी मोजले 2 कोटी 69 लाख

बेळगाव : वाहन झाडावर आदळून सहा ठार; रामदुर्ग तालुक्यातील घटना

Back to top button