२५ लाख रुपये द्या, मुलाची डेडबॉडी न्या! चीनमधील हॉस्पिटलची अट | Indian Student Death in china

२५ लाख रुपये द्या, मुलाची डेडबॉडी न्या! चीनमधील हॉस्पिटलची अट | Indian Student Death in china
Published on
Updated on

चेन्नई; वृत्तसंस्था : एमबीबीएस करत होता मुलगा माझा. पाच महिन्यांनी डॉक्टर होणार होता… त्याला शिकविण्यासााठी मी राहते घरही विकून टाकले. शेत विकले. भाड्याच्या घरात राहतो आता. मागच्याच महिन्यात… 11 डिसेंबरला जेव्हा तो चीनसाठी निघाला होता, माझे अश्रू पुसत म्हणाला, अब्बू आता पुन्हा येईन तेव्हा तुमचे सगळे कर्ज फेडेन आणि पांगही फेडेन… (Indian Student Death in china)

आमच्याही आनंदाला उधाण आलेले असताना 1 जानेवारीला मुलाच्या कॉलेजमधून फोन आला, तो गेला म्हणून… आता ते लोक (कॉलेज/हॉस्पिटलवाले) व्हिडीओ कॉलवरून मुलाचा चेहराही मला दाखवायला तयार नाहीत. तुमच्यावर आमचे 25 लाख रुपये निघतात ते आधी द्या, तरच मुलाची बॉडी तुम्हाला देऊ, असे ते म्हणताहेत… ही व्यथा आहे सय्यद अब्दुल हसन शादली या पित्याची. (Indian Student Death in china)

तामिळनाडूतील पुदुकोट्टाई जिल्ह्यातील ते रहिवासी. पाच वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा शेख अब्दुल्ला एमबीबीएस करायला चीनला गेला. किकिहार वैद्यकीय विद्यापीठात तो सध्या इंटर्नशिपही करत होता. गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे इथेच घरी होता. ऑनलाईन शिक्षण सुरू होते. महिनाभरापूर्वी विद्यापीठाने त्याला इंटर्नशिपसाठी बोलावून घेतले. चीनला पोहोचल्यानंतर आठवडाभर त्याला क्वारंटाईन करण्यात आले. सातच दिवसांपूर्वी तो हॉस्टेलला पोहोचला होता. तोवर सगळे ठिक होते. दहाव्या दिवशी बरे वाटत नाही म्हणून त्याचा फोन आला. त्याला उलट्या होत होत्या. औषध घेतले पण बरे वाटत नव्हते. दवाखान्यात दाखल केले. त्याच्या रुममेटने सांगितले, तो बेशुद्धच आहे. इथे आमचीही शुद्ध हरपली. विद्यार्थ्यांनीच 40 हजार रुपये जमवले आणि ते दवाखान्यात भरले. नंतर दवाखान्यातून फोन आला. 6 लाख रुपये मागत होते. कशीबशी तजवीज केली. नो ऑब्जेक्शन म्हणून व्हिडीओ कॉलवर माझी संमती घेतली. पुन्हा चीनमधून फोन आला…. आता 25 लाख रुपये द्या, असा फोन एक जानेवारीला पुन्हा आला… अब्दुल्ला मरण पावल्याची बातमी हॉस्पिटलवाल्यांनी दिली. नंतर जेव्हाही फोन केला तेव्हा, 25 लाख रुपये द्या डेड बॉडी न्या, असे एकच उत्तर हे चिनी लोक देत आहेत. हे सगळे सांगताना सय्यद अब्दुल यांना अश्रू आवरत नाहीत. त्यांनी सरकारकडे गार्‍हाणे मांडले आहे. त्यांना फक्त मुलाला शेवटचे पहायचे आहे.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news