अक्षय केळकर ठरला मराठी बिग बॉस ४ चा विजेता | Marathi Bigg Boss Season 4 Winner | पुढारी

अक्षय केळकर ठरला मराठी बिग बॉस ४ चा विजेता | Marathi Bigg Boss Season 4 Winner

मुंबई; पुढारी ऑनलाईन : गेल्या शंभर दिवसांपासून चालेली चढओढ, कूरघोडी, इर्षा, स्पर्धा या सर्व खेळात अखेर मराठी बिग बॉसच्या घरातला विजेता कोण होणार याचा निकाल आज लागला. मराठी बिग बॉस सिझन ४ चा विजेता होण्याची बाजी अखेर अक्षय केळकर याने जिंकली आणि बिग बॉसचा नवा विजेता महाराष्ट्राला मिळाला. (Marathi Bigg Boss Season 4 Winner)

मागील ९९ दिवसांतील स्पर्धेत एकूण १६ स्पर्धापैकी अभिनेता किरण माने, अमृता धोंडगे, राखी सावंत, अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर या पाच अखेरच्या स्पर्धाकातून अक्षय याने बाजी मारत मागील १०० दिवसांपासून सुरु असेलेल्या चढाओढीचा अखेर केला. बिग बॉस सिजन ४ ने दरवर्षी प्रमाणे यंदा मराठी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. (Marathi Bigg Boss Season 4 Winner)

बीग बॉसच्या घरातील आपली वागणूक, प्रेम, भांडण, चर्चा, वाद, शिव्याशाप, आरोप प्रत्यारोप करत स्पर्धक एकमेकांना कुरघोडी करत बाजी मारत होते. सर्वांनीच आपआपली फॅन फॉलोईंग कमावली व प्रेक्षकांचे प्रेम व सहाय्य मिळवत या ठिकाणी अंतिम टप्प्यापर्यंत मजल मारली. शेवटच्या टप्प्यात अखेरच्या पाच स्पर्धकातून अक्षय केळकरने बाजी मारत बीग बॉसच्या घरातली १५ लाख ५५ हजारांची रक्कम पटाकवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


अधिक वाचा :

Back to top button