बंगळुरु रेल्वे स्टेशनवर बॅरेलमध्ये आढळला महिलेचे सडलेला मृतदेह | Woman Body Found At Bengaluru Rail Station | पुढारी

बंगळुरु रेल्वे स्टेशनवर बॅरेलमध्ये आढळला महिलेचे सडलेला मृतदेह | Woman Body Found At Bengaluru Rail Station

बंगळुरु; पुढारी ऑनलाईन : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील यशवंतपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅट फॉर्म क्रमांक १ वर कचरा टाकण्याच्या प्लॅस्टीकच्या बॅरेलमध्ये महिलेचा सडलेला मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून रेल्वे पोलिस या प्रकरणी तपास करत आहे. अद्याप या महिलेचा ओळख पटू शकलेली नाही. ( Woman’s Body Found At Bengaluru Rail Station)

रेल्वे स्टेशनवरील प्लॅट फॉर्म क्रमांक १ वर कचरा टाकण्यासाठी ठेवलेल्या बॅरेलमधून अतिशय उग्र वास येत असल्याचे एका सफाई कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. यावेळी त्याने जावून पाहिले असता त्यात महिलेचा सडलेला मृतदेह आढळून आला. या गोष्टी माहिती त्या कर्मचाऱ्याने रेल्वे पोलिसांना दिली. यानंतर रेल्वेस्टशनवर एकच खळबळ उडाली. ( Woman’s Body Found At Bengaluru Rail Station)

तीन दिवसांहून अधिक काळ हा मृतदेह डस्टबिनमध्ये पडून होता, अशी माहिती रेल्वे पोलीस अधीक्षक डॉ. सौम्यलता यांनी दिली. बॅरेलमध्ये मृतदेह कपड्याने झाकून नंतर बॅरेलचे टोपण लावले होते. मृत महिला ही सुमारे वीस वर्षाची असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अद्याप तिची ओळख पटलेली नाही. घटना स्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम पोहचली असून ते तपास करत असल्याची माहिती बंगळुरु विभागाच्या अतिरिक्त विभागीय व्यवस्थापिका कुसूम हरिप्रसाद यांनी दिली.

या याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


अधिक वाचा :

Back to top button