

पुढारी ऑनलाईन : पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तान सरकारने देशातील मॉल, लग्नाचे हॉल, बाजार रात्री ८.३० नंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्जा बचत व्हावी आणि कच्चा तेलाची आयात कमी करता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (Pakistan Economic Crisis)
पाकिस्तानच्या कॅबिनेटच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन धोरण मंजुर करण्यात आले. हे धोरण ऊर्जा बचत करण्यासाठी स्वीकारण्यात आले आहे.
या धोरणानुसार मार्केट आणि मॉल्स रात्री ८.३०ला बंद केले जातील तर लग्नाचे हॉल रात्री १० वाजता बंद केले जातील. या उपाययोजनांमुळे पाकिस्तानचे ६० अब्ज रुपये वाचतील, असे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे.
याशिवाय पारंपारिक पद्धतीचे बल्ब आणि कमी कार्यक्षमतेचे पंखे निर्मिती पूर्ण बंद करण्यात आली आहे. याशिवाय सरकारी कार्यालयातील वीज वापरावरही नियंत्रण येणार आहे. तसेच रस्त्यावीर वीजचे फक्त निम्म्या खांबावर दिवे सुरू ठेवले जाणार आहेत. तसेच पाकिस्तानात पेट्रोलचा खप कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक दुचाकींनी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
सध्या पाकिस्तान भयंकर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानात महागाईचा दर २१ ते २३ टक्के इतका झाला आहे, तर वित्तीय तुट ११५ टक्केंवर पोहोचली आहे.
हेही वाचा