COVID-19 : चीनमधील कोरोना संसर्ग वाढीवर WHO चिंतीत, कोविड डेटा देण्याची मागणी

COVID-19 : चीनमधील कोरोना संसर्ग वाढीवर WHO चिंतीत, कोविड डेटा देण्याची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमध्ये ओमायक्रॉनच्या बीएफ.७ या सबव्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. चीनमधील 'झिरो कोविड' धोरण मागे घेतल्यानंतर, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी तेथील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढीवर चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी चीनमधील परिस्थितीबद्दल WHO खूप चिंतीत असल्याचे म्हटले आहे. तसेच बीजिंगला परिस्थितीच्या गांभीर्याबद्दल तपशीलवार माहिती देण्याचे आवाहन देखील केले आहे. टेड्रोस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

डब्ल्यूएचओ प्रमुख गेब्रेयसस यांनी सांगितले की, "जागतिक आरोग्य संघटना चीनमधील परिस्थितीबद्दल खूप चिंतित आहे. कोविड-१९ च्या तीव्रतेबद्दल अधिक माहितीची आवश्यकता आहे. गंभीर आजाराच्या वाढत्या घटनांमुळे WHO चिंतीत आहे," असे त्यांनी म्हटले आहे.

चीनकडे कोरोनाशी संबंधित अहवालाची मागणी

डब्ल्यूएचओचे प्रमुख गेब्रेयसस यांनी सांगितले की, कोविड-19 नंतरची परिस्थिती आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे. संसर्गाचे दीर्घकालीन परिणाम सहन करणार्‍या लोकांवर उपचार कसे करावे, हे आम्हाला समजत नाही. या साथीची सुरुवात कशी झाली, हे समजून घेण्यासाठी अचूक डेटा आवश्यक आहे. आम्ही चीनला डेटा शेअर करण्याची विनंती केली आहे. परिस्थितीचे सर्वसमावेशक जोखीम मूल्यांकन करण्यासाठी, डब्ल्यूएचओला रोगाची तीव्रता, हॉस्पिटलायझेशन आणि अतिदक्षता विभाग याबद्दल अधिक तपशीलवार माहिती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news