Amazon नंतर जेफ बेझोस यांच्या आणखी एका कंपनीत नोकरकपात, २,५०० पैकी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना नारळ

Amazon नंतर जेफ बेझोस यांच्या आणखी एका कंपनीत नोकरकपात, २,५०० पैकी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना नारळ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पाचव्या क्रमांकावर असलेले जेफ बेझोस आता अॅमेझॉन (Amazon) नंतर त्यांच्या आणखी एका कंपनीत नोकरकपात करणार आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट (Washington Post) या प्रकाशनाने नोकरकपातीची घोषणा केली आहे. Washington Post चे प्रकाशक फ्रेड रायन यांच्या म्हणण्यानुसार, वॉशिंग्टन पोस्ट पुढील वर्षाच्या सुरुवातीला नोकरकपात करणार आहे. या कंपनीच्या बैठकीदरम्यान, रायन यांनी सांगितले आहे की वृत्तपत्रात २,५०० कर्मचारी असून त्यातील कर्मचारी कपात ही 'सिंगल-डिजिट टक्केवारी'मध्ये असेल. पण त्यांनी नोकरकपातीबाबत अधिक तपशील उघड केलेला नाही.

रायन यांनी म्हटले आहे की, काढून टाकल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची उणीव भरून काढण्यासाठी नवीन काही पदे निर्माण केली जातील आणि कर्मचाऱ्यांची एकूण संख्या कमी केली जाणार नाही. त्यांनी असाही दावादेखील केला आहे की नोकरकपातीमुळे असे समजू नये की आम्ही आमच्या महत्वाकांक्षेपासून दूर जात आहोत. पण त्याऐवजी वाचकांच्या गरजा पूर्ण न करणार्‍या उपक्रमांमध्ये संसाधनांची गुंतवणूक कायम ठेवू शकत नाही.

वॉशिंग्टन पोस्टने याआधी त्यांचे साप्ताहिक बंद करणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे ११ न्यूजरूम कर्मचार्‍यांना नोकरी गमवावी लागणार आहे. आर्थिक स्थिती बिघडत असल्याचे त्यामागील कारण होते. त्यानंतर काही आठवड्यांतच आता कंपनीने वृत्तपत्रात नोकरकपातीची घोषणा केली आहे.

वॉशिंग्टन पोस्टच्या एका रिपोर्टमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की साप्ताहिकचा अखेरचा अंक २५ डिसेंबर रोजी प्रकाशित केला जाईल. वॉशिंग्टन पोस्टने पुलित्झर पारितोषिक विजेत्या नृत्य समीक्षक सारा एल. कॉफमन यांनाही नोकरीवरुन कमी केले आहे. त्यांच्याकडे वृत्तपत्रात नवीन कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.

वृत्तपत्राचा आर्थिक गाभा जाहिरातींवर अवलंबून आहे. पण सध्याची आर्थिक परिस्थिती कठीण असल्याने नोकरकपात केली जात असल्याचे कारण कंपनीने दिले आहे. "ज्यांना काढून टाकले जाईल, त्यांच्यासाठी ही कठीण वेळ असेल." असेही कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान, नोकरकपातीचा निर्णय जाहीर करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. पण, वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, कोणालाही उत्तर न देता प्रकाशक रायन बैठकीतून निघून गेले.

ॲमेझॉननं १० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकलं

Amazon ने गेल्याच महिन्यात नोकरकपातीचा निर्णय जाहीर केला होता. ॲमेझॉनने सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले आहे. हे कर्मचारी टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल विभागातील आहेत. ॲमेझॉनने कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी ३ टक्के एवढी आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news