Amazon Layoff : ‘अ‍ॅमेझॉन’च्या २०,००० कर्मचार्‍यांवर बेरोजगारीची टांगती तलवार | पुढारी

Amazon Layoff : 'अ‍ॅमेझॉन'च्या २०,००० कर्मचार्‍यांवर बेरोजगारीची टांगती तलवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही अनेक दिवस अनेक कंपन्यांनी  कर्मचारी कपातीचे धोरण कायम ठेवले आहे. अ‍ॅमेझॉन कंपनीने काही दिवसांपूर्वीच १०,००० हजार कर्मचारी कपात करणार असल्याची योजना आखली होती; पण कंपनीने आता या कर्मचारी कपात संख्येत बदल केला आहे. नव्या कर्मचारी कपातीच्या माहितीनुसार, अ‍ॅमेझॉन आता २०,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. त्यामुळे सध्याची ही कपात याआधीच्या कपातीच्या निर्णयापेक्षाही दुप्पट आहे. वितरण विभाग, तंत्रज्ञान विभाग त्याचबरोबर कार्यालयातील इतर काही अधिकारी या विभागामधील कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाऊ शकते, असा प्राथमिक माहिती ॲमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी दिली आहे.  (Amazon Layoff)

खर्चात कपात करण्यासाठी निर्णय

कर्मचारी कपातीबाबत अ‍ॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी नुकतीच माहिती दिली.अ‍ॅमेझॉन अनेक विभागांमधील कर्मचार्‍यांना कमी करण्‍याची तयारी करत आहे. “ कोरोना महामारीच्या काळातील नुकसान यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती घसरत असल्याने खर्चात कपात करण्याची गरज आहे.” या कारणामुळे कंपनी कर्मचारी कपात करेल असे अंदाज त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.  (Amazon Layoff )

कर्मचार्‍यांच्या कामगिरीचे होणार मूल्यांकन

एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार, ॲमेझॉन कंपनीतील कर्मचारी कपातीची संख्या यापूर्वीच्या संख्येपेक्षा वाढवत आहे. यामध्ये विशेषत: कंपनीतील अनेक विभागातील कर्मचार्‍यांना कमी करण्‍याचे नियोजनावर चर्चा सुरु आहे. यामध्ये सर्वात वरिष्ठ पदांवरील व्यक्तींचा देखील समावेश असू शकतो. कंपनीने व्यवस्थापकांना कर्मचार्‍यांच्या कामाच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यास सांगितले आहे. याआधारेच  कंपनी २०,००० लोकांची कामावरून कमी करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करणार आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये भीताचे सावट

ई-कॉमर्स मधील सर्वात मोठी कंपनी म्हणून अ‍ॅमेझॉनची ओळख आहे. कर्मचार्‍यांना याआधीच अलर्ट केले गेले आहे की, कर्मचार्‍यांना २४ तास आधी कर्मचारी कपातीबाबतची नोटीस पाठविली जाईल. कर्मचारी कपातीबाबतच्या माहितीमुळे कंपनीतील कर्मचार्‍यांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा

Back to top button