रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन शिडीवरून कोसळले | पुढारी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन शिडीवरून कोसळले

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन गंभीर आजारी असून त्यामुळेच गेल्या आठवड्यात ते आपल्या निवासस्थानात शिडीवरून पडले असल्याचा दावा अमेरिकन माध्यमांनी केला आहे. दरम्यान या घटनेनंतर पुतीन रशियाच्या एका विशेष टेस्टिंग लॅबच्या दौर्‍यावर गेले होते. पुतीन यांना कॅन्सर झाल्याने त्यांना अन्न गिळता येत नसल्याचे जगभरातील माध्यमांनी दावा केला असताना दुसरीकडे रशियन सरकराने या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.

न्यूयॉक पोस्ट या वृत्तसंस्थेने पुतीन यांचा आजार आणि ते शिडीवरून पडली असल्याची माहिती दिली आहे. पुतीन आपल्या अधिकृत निवास्थानातील शिडीवरून उतरत होते. यावेळी त्यांचे नियंत्रण सुटले आणि ते खाली कोसळले. सुरक्षा रक्षकांनी त्यांना उचलले मात्र त्यांच्या कमरेच्या खाली भागाला जखम झाली असल्याचे सांगण्यात आले.

पुतीन यांना कॅन्सर असल्याने त्यांना पोटासंबंधीच्या अनेक समस्यांना सामोर जावे लागत आहे, कारण अशा प्रकारच्या रुग्णांच्या पोटार गॅस तयार होतो. पुतीन यांचा कॅन्सर शेवटच्या टप्प्यात असल्याचे काही माध्यमांनी दावा केला आहे. सध्या त्यांची प्रकृती चांगली असून त्यांना चालताना अडचणी येत असल्याचे रशियन प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Back to top button