जगातल्या या पाच दिग्गज कंपन्यांचे सीईओ आहेत भारतीय | पुढारी

जगातल्या या पाच दिग्गज कंपन्यांचे सीईओ आहेत भारतीय

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मधील जगातील दिग्गज कंपनी असणाऱ्या ट्विटरच्या सीईओ पदी भारतीय असलेल्या पराग अग्रवाल यांची निवड झाली. भारतीयांसाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. ट्विटरचे नव्हे तर जगातील पाच मोठ्या कंपन्यांचे सीईओ आता भारतीय आहेत.

आता Google, Microsoft, Adobe, IBM, Palo Alto Networks आणि Twitter या कंपन्यांचे सीईओ भारतात राहिलेले आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, अडोबचे शंतनू नारायण, आयबीएमचे अरविंद कृष्ण, पालो अल्टो नेटवर्कचे निकेश अरोरा आणि आता ट्विटरच्या सीईओ पदी पराग अग्रवाल यांची निवड झाली आहे.

यापूर्वीचे ट्विटरचे जॅक डोर्सी यांनी कंपनी सोडल्याची घोषणा केली. ही बातमी आल्याच्या काही तासांतच डोर्सी यांनी एक पोस्ट करुन करून सीईओ पद सोडल्याचे मान्य केलं. भारतीय वंशाचे पराग अग्रवाल हे आता ट्विटरचे सीईओ असतील अशी घोषणा कंपनीने केली आहे.

पराग अग्रवाल यांनी IIT मुंबईचे विद्यार्थी होते. २०११ मध्ये त्यांनी ट्विटर जॉईन केलं. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून फिलॉसॉफी मध्ये पीएचडी केली आहे, याव्यतिरिक्त त्यांनी Microsoft आणि AT&T सारख्या कॉर्पोरेशनसाठी काम केलं आहे.

parag agrawal : मुंबई आयआयटी ते ट्विटरचा प्रवास

पराग अग्रवाल यांचे आणि ट्विटरचे २०११ मध्ये नाते बनले. याआधी त्यांनी याहू आणि मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये काम केले हाेते. अग्रवाल हे आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी केली आहे. ट्विटरवर जाहिरात अभियंता म्हणून रूजू झालेल्या अग्रवाल यांना ऑक्टोबर २०१७ मध्ये कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) बनवण्यात आले. कंपनीचे तांत्रिक धोरण ते मोठ्या शिताफीने हाताळत होते. PeopleAI च्या मते, परागची यांची एकूण संपत्ती १.५२ मिलियन डॉलर इतकी आहे.

हेही वाचलत का?

Back to top button