गूगलची मातृसंस्था अल्फाबेटचे सीईओ बनले सुंदर पिचाई | पुढारी

गूगलची मातृसंस्था अल्फाबेटचे सीईओ बनले सुंदर पिचाई

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांचे प्रमोशन झाले असून गूगलची मातृसंस्था अल्फाबेटच्या सीईओपदी त्यांची निवड झाली आहे. जगातील सर्वात शक्तीशाली कॉर्पोरेट व्यक्तींपैकी एक सुंदर पिचाई आहेत. 

गूगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांनी अल्फाबेटच्या नेतृत्व भूमिकेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. पेज आणि ब्रिनने सिलिकॉन व्हॅलीच्या कंपनीमध्ये मोठे बदल केल्याची घोषणा आपल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केली. यामध्ये पिचाई यांच्या निवेदनाचाही समावेश आहे. आपल्या निवेदनामध्ये पिचाई यांनी स्पष्ट केले आहे की, या बदलामुळे अल्फाबेटची संरचना किंवा कामावर कोणताही परिणाम होणार नाही. 

पेज आणि ब्रिन म्हणाले की, अल्फाबेट आणि गूगलला दोन सीईओंची आणि अध्यक्षांची आवश्यकता नाही. सुंदर गूगल आणि अल्फाबेट दोन्हींचे सीईओ असतील. त्यांच्याकडे कार्यकारी जबाबदारी असेल.’

Back to top button