अमेरिकेत वॉलमार्टमध्ये गोळीबार; १० ठार | पुढारी

अमेरिकेत वॉलमार्टमध्ये गोळीबार; १० ठार

मोठी बातमी : अमेरिकेत वॉलमार्टमध्ये गोळीबार; १० ठार

पुढारी ऑनलाईन – अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात वॉलमॉर्टमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. तर पोलिस कारवाईत गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला मारण्यात आले आहे. (Shooting at US Walmart store multiple fatalities)

चिसापेक येथे ही घटना घडली आहे. सॅमस सर्कल येथील वॉलमार्टमध्ये गोळीबार झाला असून काहींचा मृत्यू झाला आहे, तर गोळीबार करणाऱ्यालाही मारण्यात आले आहे, असे चिसापेक प्रशासनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

Rawsalert या ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार हा गोळीबार करणारा व्यक्ती वॉलमार्टचा मॅनेजर होता, त्यानेच मॉलमध्ये कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत या मॅनेजरला मारण्यात आले आहे. मिशेल वोल्फ या पत्रकाराने ट्विटरवर मृतांची संख्या १०च्या वर असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button