अमेरिका : माथेफिरु तरुणाच्‍या गोळीबारात ८ ठार  | पुढारी

अमेरिका : माथेफिरु तरुणाच्‍या गोळीबारात ८ ठार 

वॉशिंग्‍टन : पुढारी वृत्तसेवा

ॲटलांटा शहरातील मसाज पार्लरमध्‍ये माथेफिरुने अंदाधूंद गोळीबार केला. मंगळवारी रात्री झालेल्‍या या धक्‍कादायक घटनेत ८ जण ठार झाले. मृतांमध्‍ये सहा आशियाई वंशाच्‍या महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी दक्षिण-पश्‍चिम जॉर्जिया परिसरातून एका २१ वर्षीय तरुणाला अटक करण्‍यात आल्‍याची माहिती स्‍थानिक पोलिसांनी दिली.  

ॲटलांटातील ईशान्‍य भागात मसाज पार्लर आहेत. मंगळवारी सायंकाळी हल्‍लेखोराने  एका मसाज पार्लरमध्‍ये अंदाधूंद गोळीबार केला. यामध्‍ये तिघांचा मृत्‍यू झाला. यानंतर दुसर्‍या पार्लरमध्‍ये  त्‍याने केलेल्‍या गोळीबारात चार महिलांचा मृत्‍यू झाला. 

याप्रकरणी दक्षिण पश्‍चिम जॉर्जिया परिसरातील २१ वर्षीय रॉबर्ट एरॉन याला अटक करण्‍यात आली आहे, अशी  माहिती ॲटलांटा पोलिसांनी दिली.  गोळीबारानंतर रॉबर्ट याने घटनास्‍थळावरुन पलायन केले. पश्‍चिम जॉर्जिया येथील तपासणी नाक्‍यावर त्‍याला अटक करण्‍यात आले. हल्‍ल्‍यामागील कारणाचा अद्‍याप स्‍पष्‍ट झालेले नाही. तसेच ॲटलांटा येथील आशियाई वंशाच्‍या नागिरकांचे वास्‍तव्‍य असणार्‍या परिसरामधील सुरक्षा व्‍यवस्‍थेत  वाढ करण्‍यात आली आहे. 

 

Back to top button