तुर्कीमधील इस्तंबूल शहर बॉम्बस्फोटाने हादरले, ६ ठार, ८१ जखमी | पुढारी

तुर्कीमधील इस्तंबूल शहर बॉम्बस्फोटाने हादरले, ६ ठार, ८१ जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे स्फोट झाला. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असुन ८१ जण गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने दिले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या स्फोटाशी संबंधित एक व्हिडिओदेखील ट्विटरवर व्हायरल झाला आहे. यामध्ये स्फोटाने आगीच्या ज्वाळा उठताना दिसत आहेत. स्फोटानंतर तिथे उपस्थित असलेले लोक पळताना दिसत आहेत.

एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या भागात हा स्फोट झाला तो भाग रहदारीचा मार्ग असून दुकाने आणि रेस्टॉरंटने वेढलेला आहे. येथे नेहमी गर्दी असते, कारण ते पर्यटक आणि स्थानिकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर स्फोटाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. इस्तंबूल बॉम्बस्फोटशी संबंधित जबाबदार व्यक्तीला अटक करण्यात आली असल्याचे वृत्त एएफपीने गृहमंत्र्यांचा हवाला देत दिले आहे. तुर्कस्तानच्या मंत्र्याने इस्तंबूल बॉम्बस्फोटाबद्दल कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (पीकेके) वर आरोप केला आहे.

हेही वाचा :

Back to top button