T20 World Cup Final : टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंचे कुटुंबीयांसोबत सेलिब्रेशन | पुढारी

T20 World Cup Final : टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंचे कुटुंबीयांसोबत सेलिब्रेशन

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. सॅम करनचा भेदक मारा आणि बेन स्टोक्सच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने हा विजय संपादन केला. (T20 World Cup Final) दरम्यान, टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी खेळाडूंनी हा विजय आपल्या कुटुंबीयांसोबत सेलिब्रेट केला. आनंदोत्सव साजरा करत असलेल्या खेळाडूंचे फोटो आयसीसीने ट्वीटरद्वारे शेअर केले आहेत.

पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम निराश (T20 World Cup Final)

दरम्यान पराभवानंतर  पाकिस्तानचा कर्णधार निराश झाला आहे. (T20 World Cup Final) सामन्यानंतर त्याने पराभवाची कारणे सांगितले आहेत. बाबर आझम म्हणाला, आम्हाला विश्वचषकात प्रेक्षकांचे चांगले समर्थन मिळाले. आम्हाला या समर्थनामुळे मायदेशात खेळत आहोत, असे वाटत होते. आम्हाला दिलेल्या समर्थनासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो. आमचा सुरूवातीच्या २ सामन्यात पराभव झाला. मात्र, अंतिम ४ संघांमध्ये आम्ही ज्यापद्धतीने पोहचलो, ते अविश्वसनीय होते.

सॅम करन ठरला ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट (T20 World Cup Final)

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करन टी-२० विश्वचषक २०२२ चा ‘प्लेयर ऑफ द टुर्नामेंट’ ठरला आहे. (T20 World Cup Final) सॅम करनने या विश्वचषकात त्याने १३ विकेट्स पटकावल्या आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात त्याने भेदक मारा केला. अंतिम सामन्यात त्‍याने ४ षटकांमध्ये केवळ १२ धावा देत ३ विकेट्स घेतल्‍या.

हेही वाचलंत का?

Back to top button