Egypt Bus Accident : इजिप्तमध्ये कालव्यात बस कोसळून अपघात; 22 ठार, 7 जखमी

Egypt Bus Accident : इजिप्तमध्ये कालव्यात बस कोसळून अपघात; 22 ठार, 7 जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इजिप्त येथील उत्तर डकालिया येथे एक मिनीबस कालव्यात कोसळली. यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला तर 7 जखमी झाले आहेत. ही बस महामार्गावरून घसरुन मन्सौरा कालव्यात कोसळली. याची माहिती मिळताच तात्‍काळ 18 रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्‍याची माहिती इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.

दरम्‍यान, जखमींना वेगवेगळया दोन रुग्णालयात दाखल केले. बस कालव्यात कोसळल्‍यानंतर परिसरातील नागरीक आणि पोलिसांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढले.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, मृतांमध्ये सहा महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. इजिप्तमध्ये दरवर्षी हजारो लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावता. बसमध्ये जवळपास 46 प्रवासी प्रवास करत होते. तसेच बसमध्ये काही विद्यार्थीही होते. सरकाने मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तर मंत्रालयाने अपघातात मृत्यु झालेल्‍या कुटुंबियांना 100,000 इजिप्शियन पौंडची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 5 हजार पौंडची मदत केली जाणार आहे. तसेच जखमींना रोख रक्‍कम, नोकरी आणि इतर मदत करण्यात येणार आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news