File Photo
Latest
भूकंपाने दिल्ली पुन्हा हादरली, ५.४ रिश्टर स्केलचा भूकंप
पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी दिल्लीत शनिवारी (दि.12) रात्री ८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्लीला भूकंपाचे धक्के बसले आहेत. ५.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे दिल्ली-एनसीआर, गजियाबाद, गुरुग्राम, नोएडा, फरीदाबाद तसेच हापूड मध्ये हादरे बसले. यापूर्वी ९ नोव्हेंबरला पहाटे दिल्लीला भूकंपाचे हादरे बसले होते.
नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी नुसार नेपाळमध्ये १० किलोमीटर खोल भूकंपाचे केंद्र असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यापूर्वी शनिवारी संध्याकाळी उत्तराखंड मधे भूकंपाचे धक्के जाणवले होते.
दरम्यान, भूकंपाचे हादरे दिल्लीसह शेजारील परिसरातही जाणवले आहेत. तसेच दिल्लीसह उत्तरप्रदेश येथील बरेली, कानपूर, लखनऊ परिसरातही धक्के जाणवले आहेत. या घटनेत जीवितहानी झाल्याची किंवा पडझड झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळाली नाही.

