पुढारी ऑनलाईन डेस्क : हजारो कोटींच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळा ( PNB scam ) प्रकरणातील आरोपी नीरव मोदीला आज ब्रिटनच्या न्यायालयाने झटका दिला. त्याने प्रत्यार्पणविरुद्ध दाखल केलेली याचिका ब्रिटनच्या न्यायालयाने फेटाळली. त्याला आता त्याच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
पंजाब नॅशनल बॅक घोटाळा प्रकरणाचा तपास ईडीसह सीबीआयही करत आहे. नीरव मोदी हा सध्या ब्रिटनमध्ये आहे. भारतात होणार्या प्रत्यार्पणाविरोधात त्याने याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी झाली.
विशेष न्यायालयाने यापूर्वी ईडीला फरारी उद्योगपती नीरव मोदीची ५०० कोटी रुपयांची सुमारे ३९ मालमत्ता जप्त करण्याची परवानगी दिली होती. जून 2020 मध्ये, फ्युजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेन्डर्स (FEO) कायदा, 2018 अंतर्गत जप्तीच्या पहिल्या आदेशात, न्यायालयाने निर्देश दिले होते की, मोदीची मालमत्ता ईडीने जप्त करावी, असे आदेश दिले होते.
सुमारे सात हजार कोटी रुपये घोटाळ्यातील आरोप नीरव मोदी विदेशात पसार झाला होता. सध्या तो लंडनच्या कारागृहामध्ये आहे. त्याला भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करत होती. आता ब्रिटनच्या न्यायालयाने त्याची याचिका फेटाळल्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ( PNB scam )
हेही वाचा :