Twitter News : आता सर्व ट्विटर युजर्संना मोजावे लागणार पैसे; एलन मस्क यांचा आणखी एक निर्णय? | पुढारी

Twitter News : आता सर्व ट्विटर युजर्संना मोजावे लागणार पैसे; एलन मस्क यांचा आणखी एक निर्णय?

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस ट्विटर आणि ट्विटरचे मालक एलन मस्क (Elon Musk) खूप चर्चेत आहे. ट्विटरचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ट्विटरबाबतीत एकापाठोपाठ एक निर्णय घेतले आहेत. त्यांनी आता आणखी एक निर्णय घेतला आहे. एका रिपोर्टनूसार सर्व युजर्सला ट्विटरसेवेसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. या निर्णयाबाबत एलन मस्क आणि ट्विटरचे कर्मचारी यांच्यात एक बैठकही झाली आहे.

Twitter News : ट्विटर युजर्सला एक महिन्याचा वेळ

एका रिपोर्टनुसार सर्व युजर्सकडून ट्विटर सेवेसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ब्लू टिकमार्क असो वा नसो प्रत्येक ट्विटर युजर्सला पैसे मोजावे लागणार आहेत. याबाबतीतत ट्विटरकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. या रिपोर्टनुसार असेही सांगण्यात आले आहे की, कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत एलन मस्क यांची एक बैठक झाली आहे. त्यामध्ये असं ठरवण्यात आले आहे की, ट्विटर युजर्सना एक महिन्याचा वेळ दिला जाईल. त्यानंतर युजर्सना कंपनीकडून महिन्याचे प्लॅन ऑफर देण्यात येईल. जेव्हा हा युजर्स हा प्लॅन स्वीकारतील तेव्हाच ते ट्विटर अकाउंट वापरु शकणार आहेत.
हेही वाचा

Back to top button