राज्यातील ७७५० ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला : १८ डिसेंबरला मतदान | पुढारी

राज्यातील ७७५० ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला : १८ डिसेंबरला मतदान

पुढारी ऑनलाईन डेस्क : गावागाड्याचा कारभार पाहणाऱ्या राज्यातील ७७५० ग्राम पंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज (दि. ९) जाहीर केला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार आहे. सध्या गावागावांतून निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू आहे. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच नव्याने स्थापित झालेल्या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी दिली.

निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ या दरम्यान सादर केले जातील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. त्यानंतर याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होईल.

कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायती अशा –

राधानगरी 66
करवीर 53
पन्हाळा 50
शाहूवाडी 49
भुदरगड 44
चंदगड 40
हातकणंगले 39
आजरा 36
गडहिंग्लज 34
कागल 26
गगनबावडा 21
शिरोळ 17

हेही वाचलंत का ? 

Back to top button