Imran Khan’s Shooter On Camera : ‘फक्त इम्रान खान यांना मारायचे होते’; मारेकऱ्याची कबुली

Imran Khan’s Shooter On Camera : ‘फक्त इम्रान खान यांना मारायचे होते’; मारेकऱ्याची कबुली
Published on
Updated on

इस्लामाबाद; पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुरुवारी (दि.३) गुजरानवाला येथे हल्ला झाला. इम्रान खान यांनी पाकिस्तानातील शाहबाज सरकारच्या विरोधात लाँग मार्च काढला आहे. त्यांचा मार्च इस्लामाबादच्या दिशेने जात होता तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोराने सांगितले की, तो फक्त इम्रान यांना मारण्यासाठी आला होता आणि त्याने एकट्यानेच हल्ल्याची योजना आखली होती. इम्रान खान एका उंच कंटेनरवर उभे राहून आपल्या समर्थकांना संबोधित करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. खान यांच्या पायाला गोळी लागली, त्यानंतर त्यांना बुलेटप्रूफ कारमधून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. (Imran Khan's Shooter On Camera)

मोहम्मद नावेद असे हल्लेखोराचे नाव असून तो वजिराबादचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. कॅमेऱ्यासमोर हल्लेखोराने आपला गुन्हा कबूल केला आणि म्हणाला, 'इमरान खान लोकांची दिशाभूल करत आहेत आणि मला हे सहन झाले नाही. मी त्यांना मारण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मला फक्त इम्रान खानला मारायचे होते. हल्लेखोर पुढे म्हणाला, 'एकीकडे अजान होत होती आणि एका बाजूला हे लोक संगीत वाजवत होते, हे मला ते आवडले नाही. (Imran Khan's Shooter On Camera)

मी एकटा आहे, माझ्या मागे कोणी नाही (Imran Khan's Shooter On Camera)

हल्लेखोर म्हणाला, 'ज्या दिवशी इम्रान खान यांनी लाहोर सोडले, तेव्हा मला वाटले होते की त्यांना सोडायचे नाही.' हल्लेखोराला विचारण्यात आले की या हल्ल्यात त्याच्यासोबत कोण होते? उत्तरात तो म्हणाला, 'माझ्या मागे कोणी नाही, मी एकटा आहे.' पीटीआयचे नेते फवाद चौधरी म्हणाले की, हा इम्रान खान यांच्या हत्येचा प्रयत्न होता. हल्लेखोराने इम्रान खान आणि पीटीआय नेतृत्वाला ठार मारण्याची योजना आखली होती. चौधरी यांनी सांगितले की, इम्रान खान यांना गोळी लागली आहे. त्यांचे खूप रक्त वाया गेले मात्र त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

'अल्लाहने नवजीवन दिले'

पीटीआयचे उपाध्यक्ष चौधरी म्हणाले की, गोळीबाराला उपस्थित लोकांनी रोखले नसते तर पीटीआयचे संपूर्ण नेतृत्व संपले असते. आपल्या निकटवर्तीयांशी संवाद साधताना इम्रान खान म्हणाले की, 'अल्लाहने मला दुसरे जीवन दिले आहे.' एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, इम्रान खान म्हणाले, 'मला माहित आहे की ते मला मारायचे होते, पण त्यांना माहित नव्हते की अल्लाह माझे रक्षण करत आहे. मी लढत राहीन'.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news