Twitter मोहिमेतील एलन मस्क यांचा ‘उजवा हात’ भारतीयच | पुढारी

Twitter मोहिमेतील एलन मस्क यांचा 'उजवा हात' भारतीयच

Twitter मोहिमेतील एलन मस्क यांचा 'उजवा हात' भारतीयच

पुढारी ऑनलाईन – जगातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर ट्विटरचे मूळ भारतीय असलेले CEO पराग अग्रवाल आणि कायदा अधिकारी विजया गड्डे यांची हकालपट्टी करण्यात आली. यांच्याबरोबर इतर काही अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला. विशेष म्हणजे ट्विटरमध्ये प्रशासकीय बदल केले जात आहेत, त्यात एलन मस्क यांना मदत करणारा व्यक्ती हा भारतीयच आहे. (Sriram Krishnan is ‘helping’ Elon Musk with Twitter)

श्रीराम कृष्णन असे या तरुणाचे नाव आहे. नवा चर्चेत आल्यानंतर त्यांनी स्वतःच एलन मस्क यांना तात्पुर्ती मदत करत असल्याचे ट्वीट करून सांगितले आहे. गेल्या आठवड्यात श्रीराम यांची नियुक्ती Chief Twit म्हणून झालेली आहे.

ते म्हणाले, “मी एलन मस्क यांना काही चांगल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तात्पुर्ती मदत करत आहे. ही फार महत्त्वाची कंपनी आहे आणि जगावर ती फार मोठा प्रभाव टाकू शकते. एलन हे घडेल.”

श्रीराम कृष्णन हे Andreessen Horowitz या व्हेंचर कॅपिटलमध्ये भागीदार आहेत. त्यांनी फेसबुक आणि स्नॅपचॅट या कंपन्यांत काम केले आहे. त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्येही काम केले आहे. श्रीराम यांना क्रिप्टोकरन्सीमध्ये विशेष रस आहे.

हेही वाचा

Back to top button