Diwali Festival : जाणून घ्या तुमच्या शहरात धनत्रयोदशी कधी? आज की उद्या? | पुढारी

Diwali Festival : जाणून घ्या तुमच्या शहरात धनत्रयोदशी कधी? आज की उद्या?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Diwali Festival : अश्विन कृष्ण त्रयोदशीला आपण धनत्रयोदशी साजरी करतो. मात्र यंदा धनत्रयोदशी ही 22 आणि 23 ऑक्टोबर म्हणजेच आज आणि उद्या अशी दोन दिवस येत आहे. त्यामुळे तसेच यावेळेस मुहूर्त आणि तिथी यानुसार काही शहरात 22 म्हणजेच आज तर काही शहरात उद्या (23) धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे.

Diwali Festival : दाते पंचांगानुसार धनत्रयोदशीच्या दोन दिवसाचा खुलासा

दि. 22 ऑक्टोबर 2022 रोजी शनिवारी द्वादशी समाप्ति सायं. ६:०३ आहे. सायंकाळी ६:०३ नंतर सूर्यास्त होत असलेल्या ठिकाणी दि. 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे तर काही प्रदेशात दि. 23 ऑक्टोबर 2022 रोजी रविवारी धनत्रयोदशी आहे.

Diwali Festival : या शहरात धनत्रयोदशी ‘आज’ असेल

दि. 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असलेली कांही प्रमुख शहरे – मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूरसह संपूर्ण कोंकण, गोवा, गोध्रा सोडून संपूर्ण गुजरात, कर्नाटकातील बेळगांव, शिरसी, उडपी, मंगळूर या प्रदेशात दि. 22 ऑक्टोबर रोजी शनिवारी धनत्रयोदशी करावी.

Diwali Festival : ‘या’ शहरात धनत्रयोदशी ‘उद्या’ असेल

दि. 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असलेली कांही प्रमुख शहरे – सोलापूर, नागपूरसह अकोला, अमरावती, अहमदनगर, इंदापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगांव, जालना, धुळे, नांदेड, परभणी, भुसावळ, यवतमाळ, लातूर, वर्धा कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, बिदर, अथणी, हुबळी, धारवाड, बेंगळूर, म्हैसूर संपूर्ण तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, जैसलमेर सोडून संपूर्ण राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब या प्रदेशात दि. 23 ऑक्टोबर रोजी रविवारी धनत्रयोदशी आहे.

Diwali Festival : धनत्रयोदशी, यमदीपदान – असे करा पूजन

आज धन त्रयोदिशीच्या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते. घरातील अलंकार, सोने – नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते. अपमृत्यु म्हणजेच अकाली, अपघाताने मृत्यू येऊ नये याकरिता सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा व घरातील प्रत्येकाने खालील श्लोक म्हणून दिव्यास नमस्कार करावा.

मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।

हे ही वाचा :

Diwali Festival : अभ्यंग स्नानाचे आरोग्यासाठी ‘हे’ आहेत फायदे

 

Back to top button