

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकन लेखक शेहान करुणातिलका (Shehan Karunatilaka) यांच्या 'द सेवन मून्स ऑफ माली अल्मेडा' या कांदबरीला २०२२ चा बुकर पुरस्कार (2022 Booker Prize) मिळाला आहे. या बाबत बुकर पुरस्काराच्या वितरकांनी ट्वीट करत शेहान करुणातिलका यांच्या कांदबरीला बुकर प्राईज घोषित झाल्याची माहिती दिली. 'द सेवन मून्स ऑफ माली अल्मेडा' ही शेहान करुणातिलका यांची दुसरी कादंबरी आहे.
शेहान करुणातिलका हे श्रीलंकेतील नामांकित लेखक आहेत. कांदबरी लेखनासह यांनी रॉक साँग, पटकथा आणि प्रवासी लेखन केले आहे. शेहान करुणातिलाका यांना इंग्रजी भाषेतील साहित्यिक बुकर पुरस्कार आणि £50,000 (रु. 46,61,756) चे पारितोषिक मिळाले आहे. (2022 Booker Prize)
श्रीलंकन लेखक शेहान करुणातिलका आपल्या पुस्तकाविषयी म्हणाले की, गृहयुद्ध संपल्यानंतर २००९ मध्ये त्यांनी याबद्दल विचार करायला सुरुवात केली. मग किती नागरिक मारले गेले आणि कोणाची चूक यावर जोरदार चर्चा झाली. या कांदबरीमध्ये एक भूत मृतदेहास त्याचा दृष्टीकोन विचारतो आणि हा माझ्यासाठीच काय सर्वांसाठी विचित्र वाटणारा विचार होता. श्रीलंकेतील गृहयुद्धाला मी अशा विडंबनात्मक पद्धतीने या कांदबरीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण, २००९ साली तत्कालीन स्थिती पाहून माझ्या मनात या बातचे विचार आले. पण, मी घाबरलो की वर्तमानातच त्याचा आढावा कसा घेणार म्हणून मी थोडा मागे गेला आणि याला १९८९ च्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण पट मांडण्याचा प्रयत्न केला आहे. (2022 Booker Prize)
बुकर पारितोषिक मिळाल्यानंतर करुणातिलाका म्हणाले, " 'सेव्हन मून' (कादंबरी) कडून मला खूप अशा आहेत, श्रीलंकेतील लोक ही कादंबरी वाचत आहेत. श्रीलंकेतील लोक यातून भ्रष्टाचार, जातिवाद आणि घराणेशाहीच्या सारखे विचार कधी उपयोगी येत नाहीत हेच समजून घेतात. पुढे लेखक करुणातिलका म्हणाले सेवन मून ही कादंबरी बुक स्टोअरमध्ये नेहमी विक्री होत राहिल, गूढ, रम्य आणि रहस्यमय साहित्याच्या विश्वात या कादंबरीस नेहमी स्थान असेल.
श्रीलंकेत फुटीरतावादी तामिळ सेना आणि सरकार यांच्यात जोरदार संघर्ष झाला. यामध्ये नागरिकांसह दोन्ही बाजूंचे दीड लाख (150000) हून अधिक लोक मरण पावले. 1983 मध्ये लहानशा बंडखोरीच्या रूपात सुरू झालेल्या रक्तरंजित गृहयुद्धाचा शेवट करण्यासाठी सरकारला जवळपास 26 वर्षे लागली.
अधिक वाचा :