Microsoft : मायक्रोसॉफ्टमध्ये टाळेबंदी कायम: १ हजार कर्मचाऱ्यांची कपात | पुढारी

Microsoft : मायक्रोसॉफ्टमध्ये टाळेबंदी कायम: १ हजार कर्मचाऱ्यांची कपात

पुढारी ऑनलाईन डेस्क : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टमध्ये  (Microsoft) टाळेबंदी कायम असून सुमारे 1 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, अशी माहिती न्यूज वेबसाइट Axios ने दिली आहे. टाळेबंदीची ही तिसरी वेळ असून मायक्रोसॉफ्टने जुलैमध्ये ‘रिअलाइनमेंट’चा एक भाग म्हणून कार्यालये आणि उत्पादन विभागांमधील 1 लाख 80 हजार कर्मचार्‍यांपैकी जवळजवळ 1 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. याबाबत कंपनीच्या व्यवसायाच्या प्राधान्यांचे नियमितपणे मूल्यांकन करून संरचनात्मक समायोजन केले जाते, असे मायक्रोसॉफ्टने एका निवेदनात म्हटले आहे.

जुलैच्या टाळेबंदीनंतर, कंपनीने (Microsoft) ऑगस्टमध्ये ग्राहक-केंद्रित R&D प्रकल्पांपैकी आणखी 200 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याची माहिती आहे. परंतु, मायक्रोसॉफ्टने किती कर्मचाऱ्यांची कपात केली, हे सांगण्यास नकार दिला आहे.

मायक्रोसॉफ्टने 1 हजार कर्मचाऱ्यांना कमी केल्याची माहिती कामावरून काढून टाकलेल्या काही कर्मचाऱ्यांनी ट्विटर आणि ब्लाइंडच्या माध्यमातून दिली आहे. मोठ्या कंपन्यांना संभाव्य मंदीची भीती वाटत आहे. त्यातच जाहिरातींमधून मिळणारा महसूल कमी होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर कंपन्या कर्मचार्‍यांना काढून टाकत असल्याचे सांगितले जात आहे.

मायक्रोसॉफ्टने जवळपास 1 हजार कर्मचाऱ्यांना गुलाबी स्लिप दिल्या आहेत. अलिकडच्या काळात, मेटा प्लॅटफॉर्म, ट्विटर यासारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी नोकऱ्या कमी केल्या आहेत. आणि वाढत्या मॅक्रो इकॉनॉमिक हेडविंड आणि मंदीचा वाढता धोका यामुळे अलीकडच्या काही महिन्यांत नवीन नोकऱ्यांना ब्रेक लावला आहे.

क्रंचबेस (Crunchbase) द्वारे संकलित केलेल्या डेटाचा हवाला देऊन, ET ने यापूर्वी अहवाल दिला होता की, मायक्रोसॉफ्ट आणि मेटा यासह बिग टेक कंपन्यांमधील यूएस टेक उद्योगातील 32,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना जुलैच्या अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये काढून टाकण्यात आले होते.

हेही वाचा :  

Back to top button