Kamikaze Drone ने रशियाचा युक्रेनवर बाँब वर्षाव; संथ गतीचे ड्रोन क्षेपणास्त्रांपेक्षाही घातक का?

Kamikaze Drone ने रशियाचा युक्रेनवर बाँब वर्षाव; संथ गतीचे ड्रोन क्षेपणास्त्रांपेक्षाही घातक का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनची राजधानी किव्ह या शहरावर रशियाने मोठा बाँब हल्ला केला आहे. हा बाँब हल्ला करण्यासाठी Kamikaze या ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. Kamikaze Drone अतिविध्वंसक प्रकारचे ड्रोन आहेत.

Kamikaze ड्रोन्सचा रशियाने युक्रेन विरोधात वापर करण्याची ही दुसरी वेळ आहे.

Kamikaze हे प्रत्यक्षात युद्ध तंत्रज्ञान असून याचा वापर जपानने दुसऱ्या महायुद्धावेळी केला होता. या तंत्रात मोठ्या प्रमाणावर स्फोटकं भरलेले विमान शत्रू राष्ट्रातील टार्गेटवर पाडले जाते. यामुळे शत्रू राष्ट्राचे अतोनात नुकसान होते. Kamikaze Drone

Kamikaze ड्रोन्स अशाच प्रकारे स्फोटकांनी भरून टार्गेटवर पाडले जाते. यात ड्रोन ही नष्ट होते, पण शत्रू राष्ट्राचे मोठे नुकसान होते. हा एक प्रकारे आत्मघाती हल्लाच असतो. असे ड्रोन काही मिनिटांसाठी टार्गेटवर घिरट्या घालतात आणि नंतर हल्ला करतात. जोपर्यंत टार्गेटचे ठिकाण स्पष्ट होत नाही, तोपर्यंत हे ड्रोन हल्ला करत नाहीत.

अशा ड्रोनचा वेग जरी कमी असला तरी मारक क्षमता एखाद्या क्षेपणास्त्रापेक्षा कमी नसते. इराणने हे ड्रोन रशियाला पुरवले आहेत, असा आरोप पूर्वीच युक्रेनने केला आहे.

हे ड्रोन कमी उंचीवरून जातात, त्यामुळे तत्सम हवाई सुरक्षा यंत्रणांना ते चकवा देतात आणि असे ड्रोन पाडायचे म्हटले तर त्यांचा स्फोट होऊन व्हायचा तो विध्वंस होतो.

अशा प्रकारच्या ड्रोनविरोधात संरक्षण यंत्रणा इस्राईलकडे आहे, त्यामुळे युक्रेन सध्या इस्राईलकडून सहकार्याची अपेक्षा करत आहे.

"शत्रू राष्ट्राकडून दिवसरात्र क्षेपणास्त्र आणि Kamikaze ड्रोनने हल्ले करत आहे. आमच्या नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शत्रू आमच्या शहरांवर हल्ले करू शकतो, पण आम्हाला वाकवू शकत नाही," असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेनस्की यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news