Swedish Prime Minister : उल्फ क्रिस्टर्सन बनले स्वीडनचे नवे पंतप्रधान; उजव्या विचारसणीच्या पक्षाचा पाठिंबा | पुढारी

Swedish Prime Minister : उल्फ क्रिस्टर्सन बनले स्वीडनचे नवे पंतप्रधान; उजव्या विचारसणीच्या पक्षाचा पाठिंबा

पुढारी ऑनलाईन डेस्क : कंझर्व्हेटिव्ह मॉडरेट पक्षाचे नेते उल्फ क्रिस्टर्सन (Ulf Kristersson) यांची स्वीडनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. ५९ वर्षीय क्रिस्टरसन यांच्याशी युती करत दक्षिणेकडील स्वीडन डेमोक्रेट्स पक्षाने त्यांना पाठिंबा दर्शविला. या युतीमध्ये आणखी तीन पक्षांचा समावेश आहे. (Swedish Prime Minister)

क्रिस्टर्सन यांनी या निवडणूकीमध्ये १७६ मातांनी विजय मिळवला आहे. येथील माध्यमांनी दिलेल्या माहितीनूसार मंगळवारी त्यांचे सरकार कार्यभार स्विकारेल. शुक्रवारी मॉडरेट पार्टी, ख्रिश्चन डेमोक्रॅट्स आणि लिबरल यांनी त्रिपक्षीय सरकार स्थापन करण्याची घोषणा केली.कंझर्व्हेटिव्ह मॉडरेट पक्षाचा प्रमुख मित्रपक्ष व उजव्या विचारसरणीच्या स्वीडन डेमोक्रॅट्सने देखील याला संसदेत पाठिंबा दिला.

माग्दालेना अँडरसन यांनी सप्टेंबर मध्ये राजीनामा दिलेला होता. त्यांच्या जागी आता आता क्रिस्टर्सन यांनी घेतली आहे. स्विडनमधील या निवडणूकीमध्ये उजव्या विचारसरणीचा विजय झाला आहे.

हेही वाचा

Back to top button