धक्‍कादायक… अमेरिकेत अपहरण झालेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबातील चौघांची हत्या, मृतांमध्‍ये 8 महिन्यांच्या मुलीचा समावेश

धक्‍कादायक… अमेरिकेत अपहरण झालेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबातील चौघांची हत्या, मृतांमध्‍ये 8 महिन्यांच्या मुलीचा समावेश
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील मर्सिड शहरात अपहरण झालेल्या चार भारतीय वंशाच्‍या नागरिकांचा  मृत्यू झाला आहे. जसदीप सिंह (वय ३६), त्याची पत्नी जसलीन कौर (वय२७), त्यांची आठ माहीन्यांची मुलगी आरुही आणि जसदीपचा भाऊ अमनदीप सिंह (वय३९) अशी त्यांची नावे आहेत. ते पंजाबमधील होशियारपूर मधील मूळ शीख एनआरआय कुटुंबातील सदस्य होते.

कॅलिफोर्निया प्रांतातील मर्सिड शहरात सोमवारी भारतीय वंशाचे जसदीप, जसलीन, त्यांची मुलगी आरुही आणि भाऊ अमनदीप यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांची कार त्यांच्या कार्यालयापासून २०-२५ किमी अंतरावर जळालेल्या अवस्थेत आढळली होती. जसदीप याचे एटीएमही वापरले गेले होते. यावरून पोलिसांनी त्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला होता. आज चौघांचेही मृतदेह एका बागेत सापडले. अपहरणकर्त्याने चौघांची हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

एका संशयिताला घेतले होते ताब्यात

अपहरणप्रकरणी बुधवारी अमेरिकन पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. तो स्वतःही गंभीर अवस्थेत सापडला होता. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. चार मृत आणि त्यांचे कुटुंबीय मूळ पंजाबमधील होशियारपूरमधील हरसी पिंडचे रहिवासी आहेत.

कार जळालेल्या अवस्थेत सापडली

सोमवारी रात्री उशिरा त्यांची कार जळालेल्या अवस्थेत सापडली होती. अपहरण झालेल्यांपैकी एकाचे एटीएम कार्ड मर्सिड काउंटी येथील एटवाटरमधील एका एटीएममध्ये वापरले गेल्‍याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानंतरच चौघांचे अपहरण झाल्याचे स्‍पष्‍ट झाले हाेते. एटीएम कार्ड वापरणाऱ्या संशयिताची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली. अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी सांगितले की, संशयिताचे नाव यीशु मैनुअल सालगाडो असे आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी त्याच्याकडे चौकशीही केली जात आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news