माजी सैनिकांना लष्करात बोलवा; युक्रेन विरुद्ध युद्ध तीव्र करण्याचे पुतीन यांचे आदेश | पुढारी

माजी सैनिकांना लष्करात बोलवा; युक्रेन विरुद्ध युद्ध तीव्र करण्याचे पुतीन यांचे आदेश

माजी सैनिकांना लष्करात बोलवा; युक्रेन विरोधात युद्ध तीव्र - पुतिन

पुढारी ऑनलाईन – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी रशियात सैन्याची जमवाजमव करण्याचे आदेश दिले आहेत. ही जमवाजमव राखीव सैनिकांसाठी आहे. याचा अर्थ ज्या रशियन नागरिकांनी यापूर्वी सैन्यात काम केले आहे, त्यांना पुन्हा सैन्यात भरती करून घेतले जाणार आहे. ही जमवाजमव अंशिक स्वरूपाची आहे, असे पुतिन यांनी म्हटले आहे. राखीव सैन्यासाठी जमवाजमव बुधवारी सुरू होणार आहे. (Putin calls up reservists for war in Ukraine)

याचाच अर्थ असा की, रशिया माजी सैनिकांना पुन्हा सैन्यात घेऊन युक्रेनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैनिकांची जमवाजमव करणार आहे. युक्रेनमधील युद्ध गेली ७ महिने सुरू असून युक्रेन अत्यंत चिवट लढा देत असल्याने सोपी वाटणारी ही लढाई दिवसेंदिवस रशियासाठी कठीण होऊ लागली आहे.

पुतीन यांनी बुधवारी सकाळी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. यात ते म्हणाले, “रशियाला आपली जमीन आणि आपले लोक यांचे संरक्षण करायचे आहे. अनेक शस्त्रांना आपल्याला उत्तर द्यायचे आहे. आमच्या लोकांच्या संरक्षणसाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत.” पुतीन यांनी यावेळी पाश्चत्य देश अण्विक हल्ल्याची भीती दाखवत आहेत, असे म्हटले आहे. रशियातील शस्त्रनिर्मिती वाढवण्यासाठी अधिक निधीची घोषणाही त्यांनी केली.

“जे आम्हाला अण्विक हल्ल्याची भीती दाखवत आहेत, त्यांनी लक्षात ठेवावे की वाऱ्याची दिशा कधीही बदलू शकते. पाश्चात्य राष्ट्रांनी शांती नको आहे,” असे पुतीन यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा

Back to top button