पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचा मार्च महिन्यात थायलंडमध्ये मृत्यू झाला. आजही
त्याचे चाहते त्याला मिस करतात. शेन वॉर्न यांनी क्रिकेट मैदान गाजवलेच त्याचबराेबर मैदानाबाहेरील अनेक घटनांमुळे ते नेहमी चर्चेत राहिले. त्याच्या मृत्यूला सहा महिने झाले आहेत. आता त्याच्याबाबत ऑस्ट्रेलियातील मॉडेल व अभिनेत्री जीना स्टीवर्ट हिने मोठा खुलासा केला आहे. तिने केलेल्या खुलाशामुळे खळबळ माजली आहे.
'डेलीस्टार'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ५१ वर्षीय मॉडेल जीना स्टीवर्ट हिने म्हटलं आहे की, शेन वॉन हे मृत्यूपूर्वी काही दिवस आपल्याबरोबर रिलेशनशीपमध्ये होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मला जबर मानसिक धक्का बसला आहे. आम्ही दोघे २०१८ मध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून संपर्कात आलो. दोघांमध्ये अनेक महिने ऑनलाईन चॅटिंग केले. एका क्रिकेट सामन्यानंतर आमची भेट झाली. त्या दिवशी आम्ही संपूर्ण रात्रभर ऑनलाईन चॅटिंग करत राहिलो. आमचे नाते सुरु झाले.
मागील काही दिवसांपासून जग पूर्णपणे बदलले आहे. जगाने एक महान क्रिकेटपटू गमावला आहे. तर माझा विशेष मित्र हरपला आहे. शेन वॉर्न हे एक महान व्यक्ती होते. थायलंडला पर्यटनाला जाण्यापूर्वी ते मला भेटले होते. त्यांच्या जीवनात मला स्थान असल्याचेही त्यांनी म्हटलं होते. मला अनेक वर्ष ओळखतात अशी त्याचे वागणे होते. मी हे आता यासाठी सांगत आहे की, मी शेन वॉर्न यांना मनापासून श्रद्धांजली अपर्ण करत असल्याचेही तिने मुलाखतीवेळी सांगितले.
जीना स्टीवर्ट ही ऑस्ट्रेलियातील एक माॅडेल व अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असते. ती चार मुलांची आई आहे. तसेच ती इंस्टाग्राम आणि टिकटॉक ॲपवरही प्रचंड लोकप्रिय आहे. ती स्वत:ची ओळख जगातील सर्वात हॉट आजी अशी करुन देते. जीना स्टीवर्टने शेन वाॅर्न यांच्यासाेबतचा इंस्टाग्रामवरील संवाद शेअर केला आहे. शेन वॉर्न आणि माझे फोटो घेण्यासाठी अनेक जण आम्हाला त्रास देत होते. यामुळे आम्ही नेहमी एकत्र बाहेर जाताना कॅप आणि गॉगल घालूनच बाहेर पडत असू, असेही तिने म्हटले आहे.
शेन वॉर्न मार्च २०२१ मध्ये आपल्या मित्रांसमवेत थायलंडमध्ये पर्यटनासाठी गेले होते. यावेळी एका हॉटेलमध्ये शेन वॉर्न यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हा नैसर्गिकच होता, असा दावा स्थानिक पोलीसांनी केला होता. जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू अशी वॉर्न यांची ओळख हेती. त्यांनी आपल्या करिअरमध्ये १४५ कसोटी सामने खेळत ७०८ विकट घेतल्या. तर १९४ एकदिवसीय सामन्यात २९३ बळी घेतले हेते. आयपीएलमध्येही त्यांनी आपली फिरकीची जादू कायम ठेवली होती. आयपीएलमधील ५५ सामन्यात त्यांनी ५७ विकेट घेतल्या होत्या.
हेही वाचा :