बांगला देशातील मृतांचा आकडा ४०० वर, शेख हसीना समर्थक २९ नेत्यांची जाळून हत्या

Bangladesh violence | बांगला देशात हिंसाचाराचा आगडोंब कायम
Bangladesh violence Sheikh hasina resignation
बांगला देशामध्‍ये शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्‍यानंतरही हिंसाचार सुरुच आहे. X (Twitter)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

शेख हसीन (Sheikh Hasina) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतरही बांगला देशामध्ये उसळलेला हिंसाचाराचा (Bangladesh violence) आगडोंब कायम आहे. या हिंसाचारात मोठी जीवितहानी झाली आहे. शेख हसीना नेतृत्व करत असलेल्या आवामी लीगच्या (Bangladesh Awami League) २९ नेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह मंगळवारी हिंसाचारग्रस्त भागात आढळून आले. यामुळे बांगला देश हिंसाचारातील मृतांचा आकडा ४०० पार झाला आहे. (Bangladesh News)

हसीना राजीनामा देऊन देश सोडून सोमवारी निघून गेल्यानंतर सातखीरा येथे झालेल्या हिंसाचारात किमान १० जण ठार झाले. अवामी लीग नेत्यांची घरे आणि व्यावसायिक आस्थापनांची तोडफोड आणि लुटमार करण्यात आली आहे, असे वृत्त ढाका ट्रिब्यूनने दिले आहे.

Bangladesh violence Sheikh hasina resignation
Bangladesh Violence | फ्रान्स राष्ट्राध्यक्षांनी भेट दिलेल्या बांगला देशातील हिंदू गायकाचे घर पेटवले

Awami League Leaders : कुमिल्लामध्ये जमावाच्या हल्ल्यात ११ ठार

कुमिल्ला शहरात जमावाने केलेल्या हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. माजी नगरसेवक मोहम्मद शाह आलम यांच्या तीन मजली घर पेटवून दिल्याने ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी घरात सापडलेल्या ११ मृतदेहांमध्ये ५ किशोरवयीन मुलांचा समावेश आहे.

सोमवारी एका जमावाने शाह आलम यांच्या घरावर हल्ला केला होता. यादरम्यान काही लोक घराच्या तिसऱ्या मजल्यावर चढले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जमावाने घराच्या तळमजल्यावर आग लावली. त्यानंतर घराच्या तिसऱ्या मजल्यावर आश्रय घेतलेल्या लोकांचा धुरामुळे गुदमरून आणि होरपळून मृत्यू झाला. या हल्ल्यात १० जण जखमी झाले आहे. त्यापैकी एकावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

खासदाराच्या घराला आग, ४ जणांचा होरपळून मृत्यू

दरम्यान, मंगळवारी खासदार शफीकूल इस्लाम शिमूल यांच्या घराला जमावाने आग लावल्याने ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह घरातील खोल्या, बाल्कनी आणि छतावर आढळून आले.

Bangladesh violence Sheikh hasina resignation
bangladesh protests | शेख हसीना यांचे कट्टर विरोधक महंमद युनूस अंतरिम सरकारचे प्रमुख

अवामी लीगच्या नेत्याच्या घरात सापडले ६ मृतदेह

ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, अवामी लीगची युवा शाखा जुबो लीगच्या दोन नेत्यांचे मृतदेह स्थानिकांना आढळून आले. त्यापैकी जुबा लीगचे नेते मुशफिकूर रहीम यांचा मृतदेह सोनागाझी उपजिल्हामधील एका पुलाखाली सापडला. बोग्रा येथे जमावाने जुबो लीगच्या दोन नेत्यांची हत्या केली.

सोमवारी लालमोनिरहाट येथे जमावाने पेटवून दिलेल्या अवामी लीगचे जिल्हा संयुक्त सरचिटणीस सुमन खान यांच्या घरातून स्थानिकांना ६ मृतदेह आढळून आले.

भारताने व्यक्त केली चिंता

शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर शेकडो हिंदू घरे, व्यवसाय आस्थापने आणि मंदिरे पेटवून देण्यात आली आहेत. अनेक भागात मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आहे. भारताने या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी, मंत्रालय बांगला देशातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे.

Bangladesh violence Sheikh hasina resignation
शेख हसीनांसाठी वाईट बातमी! अमेरिकेत प्रवेशावर बंदी, व्हिसा रद्द

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news