जोहान्सबर्ग शहरातील बारमध्ये हल्लेखोरांचा अंधाधुंद गोळीबार, १४ जणांचा मृत्यू | पुढारी

जोहान्सबर्ग शहरातील बारमध्ये हल्लेखोरांचा अंधाधुंद गोळीबार, १४ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील बारमध्ये हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात १४ जणांचा मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची त्यांनी म्हटले आहे.

द. आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग शहरातील सोवेटो टाऊनशिपमधील बारमध्ये शनिवारी रात्री हल्लेखोरांनी गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर बंदुकधारी पांढऱ्या रंगाच्या टोयोटा क्वांटम मिनीबसमधून पळून गेले. या घटनेची माहिती देताना पोलीसांनी सांगितए की, शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले, पण तोपर्यंत १२ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. दोघांना जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे मृतांची संख्या १४ वर पोहचली.

मृतांचे वय वय १९ ते ३५ वर्षे

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मृत्यू झालेल्यांचे वय १९ ते ३५ वर्षे दरम्यान आहे. ओरलँडो पोलिस स्टेशनचे कमांडर कुबेका यांनी सांगितले की, सर्व स्तरांवर तपास केला जात आहे. हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्यासाठी प्रयत्न केले जातील.

या हल्ल्याचे काही व्हिडिओ फुटेजही समोर आले आहे. त्यात बारमध्ये मौजमजा करण्यासाठी आलेल्या लोकांचे मृतदेह जमिनीवर पडलेले दिसत आहेत. जीव वाचवण्यासाठी लोक इकडून तिकडे धावत असल्याचे दिसते. अनेक लोक हल्लेखोरांकडून जीवाच्या अकांताने धावत होते, पण हल्लेखोर गोळ्या झाडतच राहिले.
अमेरिकेत अशा घटना घडतायत दररोज

अमेरिकेत अशा घटना रोज घडत असल्याचे समोर आले आहे. ५ जुलै रोजी अमेरिकेतील इंडियाना येथे झालेल्या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोरांनी १० जणांवर गोळीबार केला होता. ही घटना ब्रेनियानाच्या गॅरी येथे घडली होती. याच्या एक दिवस आधी अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी शिकागोमध्ये गोळीबार झाला होता. फ्रीडम परेडमधून बाहेर पडत असताना अचानक गोळीबार झाला. परेडमध्ये गोळीबार झाल्यानंतर गोंधळ उडाला. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर २४ जण जखमी झाले आहेत. त्या घटनेत हल्लेखोराने छतावरून गोळ्या झाडल्या होत्या.

Back to top button