iPhone 11 Pro ठरला ‘चिलखत’! मोबाईलमुळे वाचलं युक्रेनच्‍या जवानाचे प्राण | पुढारी

iPhone 11 Pro ठरला 'चिलखत'! मोबाईलमुळे वाचलं युक्रेनच्‍या जवानाचे प्राण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ॲपल iPhone हे नाव उच्‍चारलं तरी मोबाईल फोन प्रेमींचे डोळे विस्‍फारतात आणि या फोनच्‍या नवीन फीचरची माहिती घेण्‍यासाठीही त्‍यांचे कानही आतूर झालेले असतात. यापूर्वीही आपण ॲपल वॉचमुळे हृद्‍यविकाराचा धोका टळल्‍याचे घटना ऐकल्‍या असतील. मात्र आता ॲपलच्‍या ( iPhone 11 Pro) आयफाेनमुळे युक्रेनमधील जवानाचे प्राण वाचले आहेत. या मोबाईल फोनने चक्‍क चिलखताचे काम करत रशियन सैन्‍याने युक्रेनच्‍या जवानावर झाडलेली गोळी परतवली आहे!

iPhone 11 Pro :  आयफाेनने वाचवला जवानाचा जीव

‘रेडिट थ्रेड’वरील माहितीनुसार, iPhone 11 Pro मुळे युक्रेनमधील एका जवानाचे प्राण वाचले आहेत. रेडिट थ्रेडमध्‍ये एक व्‍हिडिओ आहे. यामध्‍ये युक्रेनचा एक जवान आपला आयफोन दाखवत आहे. बॅकपॅकमध्‍ये अडकलेल्‍या बुलेटसह खराब झालेला आयफोन तो बाहेर काढत असल्‍याचे या व्‍हिडिओमध्‍ये दिसते. जवानाच्‍या खिशातील iPhone 11 Pro गोळी लागली मात्र ती जवानाला लागली नाही. फोनचे नुकसान झाले; पण या फोनने माझा जीव वाचवला, असे या जवानाने म्‍हटलं आहे.

रेडिटच्‍या या पोस्‍टवर हजारो नेटकर्‍यांनी कमेंट केल्‍या आहेत. एका युर्जरने म्‍हटलं आहे की, एक दिवस ‘ॲपल’ डॉक्‍टरांनी बाजुला ठेवेल! तर एकाने म्‍हटलं आहे की, आयफोन हा सर्वच बाबींसाठी चांगला आहे, आणखी एकाने सूचवले आहे की, स्‍मार्टफोनमध्‍ये वापरल्‍या जाणार्‍या साहित्‍य बुलेटप्रूफ का तयार करु नये.

iPhone 11 Pro हे ॲपलच्‍या फोनचे तीन वर्षांपूर्वीचे मॉडेल आहे. हे मॉडेल iPhone XR आणि iPhone 11 Pro Max सोबत लॉन्च झाले होते. ॲपल कंपनीने नेहमीच गुणवत्तेला प्राधान्‍य दिले असल्‍याचे आजवरच्‍या मोबाईल फोन मॉडेलवरुन स्‍पष्‍ट झालेच आहे. आता या फोनने एका जवानाचा जीव वाचवणे हा एक चमत्‍कारच आहे, असेही एका युर्जरने म्‍हटलं आहे. नुकतेच ॲपल वॉचमुळे एका ३४ वर्षीय भारतीय तरुणाचा हृद्‍यातील ब्‍लॅकेज असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते. या वॉचमधील ईसीजी वैशिष्‍ट्यामुळे या तरुणाचा जीव वाचविण्‍यास मदत झाली होती.

हेही वाचा :

Back to top button